Firing at LOC : गस्त घालणाऱ्या जवानांवर सीमेपलीकडून गोळीबार, भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

Firing at LOC : पाकिस्तानी चौक्या ‘तातीक-१’ आणि ‘जबरन एफडब्ल्यूडी (जीएफ-९८३८)’ वरून झाला गोळीबार

73

जम्मू- काश्मीर (Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिकांवर (Indian soldiers) पाकिस्तानी (Pakistan) हद्दीतून गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैनिकांनी लगेचच प्रत्युत्तर दिले ज्यामुळे हल्लेखोर मागे हटले.या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. तरी पण लष्कराला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Firing at LOC)

(हेही वाचा – Crime News : गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू)

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाकिस्तानी चौक्या ‘तातीक-१’ आणि ‘जबरन एफडब्ल्यूडी (जीएफ-९८३८)’ वरून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी भारतीय सैनिक त्यांच्या चौकीजवळ गस्त घालत होते. भारतीय सैन्यानेही त्यांना प्रत्युत्तर दिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

भारतीय गुप्तचर संस्थांचा दावा आहे की,” पाकिस्तानने उन्हाळ्याची चाहूल लागताच जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे लाँच पॅडवर सुमारे ८० ते १०० दहशतवाद्यांना तयार ठेवले आहे. घुसखोरीचा कोणताही प्रयत्न त्वरित हाणून पाडता यावा यासाठी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

अलीकडेच अखनूर येथे पार पडलेल्या माजी सैनिकांच्या रॅलीत

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला होता.जर पाकिस्तानने पीओकेमधील दहशतवादी तळ आणि लाँच पॅड नष्ट केले नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते. भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच माजी सैनिकांना संबोधित करताना त्यांनी त्यांना आश्वासन दिले की भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलेल. (Firing at LOC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.