
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) विजापूर (Bijapur) आणि नारायणपूरला (Narayanpur) लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल (Security forces) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites ) चकमक झाली आहे. यामध्ये ३१ नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. तर, २ जवान हुतात्मा झाले आहेत. (Chhattisgarh)
सकाळपासून चकमक सुरू
चकमकीच्या ठिकाणाहून स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सातत्याने कारवाई करत आहेत. विजापूरच्या फार्सगढ पोलिस स्टेशन राष्ट्रीय उद्यान परिसरात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सकाळपासून (9 फेब्रु.) चकमक सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून डीआरजी विजापूर, एसटीएफ, सी-६० जवानांसोबत चकमक सुरू असल्याची पुष्टी झाली आहे. या चकमकीत सुमारे ३१ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. (Chhattisgarh)
हेही वाचा-Chhattisgarh मधील विजापूर-नारायणपूर सीमेवर चकमक, जवानांनी १२ नक्षलवाद्यांना केले ठार ; शस्त्रे जप्त
डीआयजी कमलोचन कश्यप (DIG Kamalochan Kashyap) म्हणाले की, जवानांशी अद्याप संपर्क झालेला नाही. हे एक मोठे ऑपरेशन आहे. राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त सुरक्षा दलांना रवाना करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान परिसरात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. नक्षलवाद्यांना मोठे नुकसान झाले आहे हे निश्चित आहे. घटनेच्या ठिकाणी नक्षलवाद्यांचे मृतदेह दिसले आहेत. सुरक्षा दल परतल्यावर या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. (Chhattisgarh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community