बांगलादेश सरकार हिंसाचारावर नियंत्रण आणणार ?; Operation Devil Hunt ला सुरुवात

Operation Devil Hunt : गृह मंत्रालयात कायदा आणि सुव्यवस्था दलांच्या समन्वयाने बैठक आयोजित

62
बांगलादेश सरकार हिंसाचारावर नियंत्रण आणणार ?; Operation Devil Hunt ला सुरुवात
बांगलादेश सरकार हिंसाचारावर नियंत्रण आणणार ?; Operation Devil Hunt ला सुरुवात

बांगलादेशात स्थानिक लोक आणि शेख हसीना (Sheikh Hasina) विरोधी विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर बांगलादेशात कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने “ऑपरेशन डेव्हिल हंट” (Operation Devil Hunt) नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे.

गाझीपूरमध्ये (Ghazipur) शुक्रवार, ७ फेब्रुवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात शनिवार, ८ फेब्रुवारी या दिवशी गृह मंत्रालयात कायदा आणि सुव्यवस्था दलांच्या समन्वयाने एक बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत, संबंधित भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवाद्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी संयुक्त दलांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

(हेही वाचा – 31 Maoists killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २ जवान हुतात्मा)

बांगलादेश (Bangladesh) सरकारने स्पष्ट केले आहे की, हा संघर्ष पुढे वाढू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ अंतर्गत कोणत्याही नागरिकांना अन्याय सहन करावा लागणार नाही, मात्र हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. गृह मंत्रालयाने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. देशातील स्थिरता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’च्या पुढील टप्प्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. गाझीपूरमध्ये सुरू झालेली ही मोहीम आता देशभर विस्तारली आहे. (bangladesh violence)

गाझीपूरमध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले होते. बुलडोझर कार्यक्रमाच्या नावाखाली माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला. यावेळी १५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. या आंदोलनादरम्यान, विद्यार्थी शेख हसीना यांच्या मंत्र्याच्या घराकडे जात असताना स्थानिकांनी त्यांना अडवले. काही क्षणांतच संघर्ष सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला. या घटनेनंतर सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. देशभरातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.