छत्तीसगड-महाराष्ट्र (Chhattisgarh-Maharashtra) सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalite) झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच अन्य दोन जवान जखमी असल्याचीही माहिती मिळत आहे. ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर (Bijapur) जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. परिसरात शोध मोहीम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : Delhi Election 2025 मध्ये ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लिहले की, नक्षलमुक्त भारत (Naxal free India) बनवण्याच्या दिशेने, सुरक्षा दलांना छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली. तसेच मानवताविरोधी नक्षलवादाचा अंत करताना आपले दोन शूर जवान हुतात्मा झाले. हा देश या वीरांचा नेहमीच ऋणी राहील. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे शाह (Amit Shah) म्हणाले.
तसेच “मी माझा संकल्प पुन्हा व्यक्त करतो की ३१ मार्च २०२६ पूर्वी आपण देशातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करू, जेणेकरून देशातील कोणत्याही नागरिकाला त्यामुळे आपला जीव गमवावा लागू नये”, असेही शाह (Amit Shah) म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community