प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! Mumbai Pune Expressway वरील ‘हा’ मार्ग सहा महिन्यांसाठी राहणार बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

135

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन (Yashwantrao Chavan Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दोन शहरांना जोडणारा हा मार्ग नेहमी गजबजलेला असतो. मुंबई-पुणे महामार्ग (Mumbai-Pune Highway) तसा फार जुना. मात्र मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प या अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याचे काम सुरू करत आहे, त्यामुळे हा मार्ग बंद (Mumbai-Pune Expressway exit route closed) ठेवण्यात येणार आहे. (Mumbai Pune Expressway)

(हेही वाचा – पुण्यात NDAजवळ सापडले पाकिस्तानी चलन; सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित)

दरम्यान, नवी मुंबई वाहतूक पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार याचा परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होणार आहे. यामध्ये हलक्या तसेच जड वाहनांच्या वाहतुकीचा देखील समावेश आहे. पनवेल, मुंब्रा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने यामुळे प्रभावित होतील. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळणे आणि बांधकाम सुरळीत पार पडावे यासाठी हे निर्बंध २४ तास लागू असतील.

दरम्यान या काळात वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ज्यानुसार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा (९.६०० किमी) येथे पळस्पे सर्कल (Palaspe Circle) मार्गे राष्ट्रीय महामार्ग-४८ वर वळवली जातील.

(हेही वाचा – Delhi Election 2025 मध्ये ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त)

तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि तळोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहनांना १.२०० किमी अंतरावरून पनवेल-सायन महामार्गावर (Panvel-Sion Highway) सरळ पुढे जावे लागेल आणि पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग-४८ मार्गे पुढे जावे लागेल. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरूपती काकडे यांनी या निर्बंधासंबंधीचे आदेश मोटार वाहन कायद्याअंतर्गत जारी केले आहेत. एमएसआरडी बांधकाम पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आदेश लागू राहतील. एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला की कळंबोली सर्कल येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल अशेही काकडे यावेळी म्हणाले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.