Uttar Pradesh मधील अंमली पदार्थ बनविणारा कारखाना साकीनाका पोलिसांकडून उध्वस्त

77
Uttar Pradesh मधील अंमली पदार्थ बनविणारा कारखाना साकीनाका पोलिसांकडून उध्वस्त
Uttar Pradesh मधील अंमली पदार्थ बनविणारा कारखाना साकीनाका पोलिसांकडून उध्वस्त

साकीनाका (Saki Naka) पोलिसांनी घास कंपाउंड, काजूपाडा पाइप लाईन, मुंबई येथे दि. ३१ डिसेंबर रोजी MD हा पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून MD हा पदार्थ विकण्यासाठी आल्यासाठी घटनास्थळी आलेल्या इस्राईल नावाच्या आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी जसीम उर्फ चिकू शकील शेख आणि प्रदीप उर्फ चिकू वीरेंद्र हरिजन (Virendra Harijan) या आरोपींना अटक केली. (Uttar Pradesh)

( हेही वाचा : राहुल गांधींनी २०२९ ला माझ्याविरोधात विधानसभा लढवावी; मंत्री Chandrashekhar Bawankule यांचे खुले आव्हान

दरम्यान तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून चौथ्या आरोपीचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. तर चौथ्या आरोपीकडे ९ पेक्षा जास्त सिम कार्ड आणि तीन मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. तसेच चौथा आरोपी मोहम्मद गौस (Mohammed Ghaus) उर्फ मोनू इद्रिसी यांचा वावर बस्ती जिल्हा, वाराणसी, लखनऊ उत्तर प्रदेश येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ फेब्रुवारी रोजी अंमली पदार्थ विरोशी पथक आरोपीच्या शोधासाठी तिकडे रवाना झाले. त्यादरम्यान आरोपी मोहम्मद गौस (Mohammed Ghaus) सतत आपला ठिकाणा बदलत असताना तपास पथकाने ७ दिवस बस्ती, आझमगड (Azamgarh), वाराणसी, मिर्झापुर, सुल्तानपूर असा पाठलाग करून त्यास लखनऊ येथे ताब्यात घेतले. आरोपीस अटक करून त्याकडे अधिक चौकशी करता त्याने MD बनविणाऱ्या आरोपीचे नाव सांगितले. या पाचव्या आरोपीला लखनऊ येथे सापळा लावून अटक केली. अखिलेश प्रताप सिंग असे पाचव्या आरोपीचे नाव होते. (Uttar Pradesh)

तसेच पाचवा आरोपी अखिलेश प्रताप सिंग याने शिवलार चौराहा, ता. मोहनलालगंज, थाना गोसियागंज, जि.लखनऊ येथील MD बनविण्याचा कारखाना तपास पथकाला दाखविला. त्यानंतर तपास पथकाने १० कोटी १८ हजार रुपयांचे MD आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच साकीनाका पोलिसांनी उत्तर प्रदेशातील हा अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला. तरी आरोपीला लवकरच न्यायलयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सकिनाका पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांनी दिली. (Uttar Pradesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.