Pariksha Pe Charcha कधी, कुठे आणि कशी पाहायची? संपूर्ण माहिती जाणून घ्या

पंतप्रधानांचा विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी थेट संवाद

67

परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेकदा तणावाचा विषय ठरतात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या “परीक्षा पे चर्चा” उपक्रमाने या संकल्पनेत विद्यार्थ्यांमध्ये  सकारात्मक बदल घडवला आहे. 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता यंदाच्या ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha 2025) या उपक्रमाचे सत्र होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि पालकांशी थेट संवाद साधणार आहेत. (Pariksha Pe Charcha)

दरम्यान, MyGov पोर्टलवरील आकडेवारीनुसार, यावर्षी ३.३० कोटींहून अधिक विद्यार्थी, ५.५१ लाखांहून अधिक पालक आणि २०.७१ लाखांहून अधिक शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेची (Board Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधतील. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, बॉलिवूड कलाकार दीपिका पदुकोण, विक्रांत मेस्सी, आध्यात्मिक गुरू सद्गुरु, ऑलिंपियन मेरी कोम आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा देखील या कार्यक्रमाचा भाग असतील.

(हेही वाचा – राहुल गांधींनी २०२९ ला माझ्याविरोधात विधानसभा लढवावी; मंत्री Chandrashekhar Bawankule यांचे खुले आव्हान)

दरवर्षी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. याशिवाय बोर्ड परीक्षेची (Board Exam) तयारी, ताणतणाव व्यवस्थापन, करिअर आणि इतर विषयांवरही चर्चा केली जाते. गेल्या वर्षी हा कार्यक्रम २९ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानात आयोजित करण्यात आला होता.

‘परीक्षा पे चर्चा २०२५’ कुठे पाहायचे?

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालय, नरेंद्र मोदी, पीआयबी, पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मीडिया पेजवर (यूट्यूब, फेसबुक, एक्स प्लॅटफॉर्म) लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवरून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा कार्यक्रम टीव्हीवर पाहू शकतील. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि चांगली तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

(हेही वाचा – Samruddhi Highway वरील प्रवाशांसाठी गुड न्यूज; ‘या’ २१ ठिकाणी मिळणार विशेष सुविधा )

यंदा, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील तिथल्या स्थानिक शिक्षण मंडळाच्या शासकीय शाळा, केंद्रीय विद्यालये, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि नवोदय विद्यालयांमधून (Navodaya Vidyalaya) 36 विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. यंदाच्या परीक्षा पे चर्चा 2025 मध्ये एकूण 7 प्रेरणादायी सत्रे होणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.