Mamta Kulkarni मुळे आखाड्यांवर लांच्छन! 

104
Mamta Kulkarni मुळे आखाड्यांवर लांच्छन! 
Mamta Kulkarni मुळे आखाड्यांवर लांच्छन! 
  • नित्यानंद भिसे

महाकुंभात सतत नवीन महामंडलेश्वरांची भर पडत आहे. निरंजनी आखाड्याने पाच नवीन महामंडलेश्वरांची नियुक्ती केली. किन्नर आखाड्यातून सहा महामंडलेश्वरांची नियुक्ती करण्यात आली होती, ज्यात ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचाही समावेश होता. महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांचे नावही यमाई माता नंदन गिरी असे करण्यात आले. पण पुढच्या ७ दिवसांतच त्यांना महामंडलेश्वर पदावरुन हटवण्यात आले. तसेच त्यांना ज्यांनी महामंडलेश्वर पद दिले त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचीही आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली. ही कारवाई वेळीच केल्यामुळे आखाड्यांवर  जे लांच्छन आले होते, ते काहीसे निवळले.

(हेही वाचा – Uttar Pradesh मधील अंमली पदार्थ बनविणारा कारखाना साकीनाका पोलिसांकडून उध्वस्त)

संत-महंतांकडून विरोध 

ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांच्या दाव्यानुसार त्यांनी चित्रपटसृष्टी सोडून जवळजवळ २३ वर्षे तपस्या केली. महामंडलेश्वर होण्यापूर्वी त्यांनी संन्यास घेतल्याचेही जाहीर केले. मात्र प्रयागराज महाकुंभात अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती केल्याबद्दल संत समुदायात नाराजी पसरली. संत – महंतांचे म्हणणे होते की, अशा व्यक्तीला महामंडलेश्वर बनवता येत नाही. महामंडलेश्वर बनवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते. एवढी मोठी पदवी अशा प्रकारे कोणालाही देता येणार नाही. संत होण्यासाठी तप आणि नामजप करावा लागतो. किन्नर आखाड्याच्या या निर्णयावर महामंडलेश्वर रामकृष्णानंद गिरी यांनीही आक्षेप घेतला. ते म्हणाले की, या उच्च पदावर पोहोचण्यासाठी व्यक्तीचे नैतिक चारित्र्य चांगले असले पाहिजे. ज्ञानी असले पाहिजे. या स्थितीत बसून व्यक्ती समाजाचे नेतृत्व करते. आपण अशाप्रकारे कोणालाही या पदावर नियुक्त करू शकत नाही.

बागेश्वर धामचे बाबा म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) म्हणाले की, “कोणत्याही प्रकारच्या प्रभावाखाली येऊन कोणालाही संत किंवा महामंडलेश्वर कसे बनवता येईल? आपण स्वतः अजून महामंडलेश्वर बनू शकलो नाही.”

(हेही वाचा – तुकडे करून ठार मारलेल्या Shraddha Walker च्या वडिलांचा मृत्यू)

योगगुरू बाबा रामदेव (Ramdev) म्हणाले की, “कोणीही एका दिवसात संत होत नाही. यासाठी वर्षानुवर्षे तपश्चर्या करावी लागते. संतपद मिळविण्यासाठी आपल्याला ५० वर्षे तपश्चर्या करावी लागली. संत असणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महामंडलेश्वर असणे ही त्याहून मोठी गोष्ट आहे. तो म्हणाला की आजकाल मला दिसत आहे की कोणालाही पकडून महामंडलेश्वर बनवता येते. तसे घडू नये.”

जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते नारायण गिरीजी महाराज म्हणाले, “आखाड्यात सर्वप्रथम एक महापुरुष, अवधूत, महंत श्री महंत तयार होतात. मग त्या व्यक्तीने राष्ट्रात धर्मप्रसारासाठी किती योगदान दिले, किती काम केले हे आखाडा पाहतो. त्या आधारेच पुढील निर्णय घेतले जातात. कोणीतरी येतो, संन्यासी बनण्याची घोषणा करतो आणि आपण त्याला थेट महामंडलेश्वर बनवतो, ही जुना आखाड्याची परंपरा नाही.”

(हेही वाचा – इथून पुढे ‘त्या’ लाडक्या बहि‍णींना योजनेचा लाभ घेता येणार नाही; CM Devendra Fadnavis यांनी केलं स्पष्ट)

ममता कुलकर्णींची वादग्रस्त पार्श्वभूमी

२०१३ मध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांनी ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामीशी लग्न केले होते. विक्की गोस्वामीसह  ममता कुलकर्णी यांच्यावरही गुन्हा दाखल होताच हे दोघे रातोरात देश सोडून गेले. १३ वर्षे भारतापासून दूर राहिल्यानंतर, गेल्या वर्षी अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) भारतात परतल्या. या वर्षी महामंडलेश्वर ही पदवी मिळाल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

वर्ष २०१६ मध्ये ठाणे पोलिसांनी २ हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) आणि तिचा पती विकी गोस्वामी (Vicky Goswami) यांचे नाव समोर आले होते. कल्याणमध्ये एका नायजेरियन ड्रग पेडलरला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून २ तरुणांना अटक करण्यात आली. त्या तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरला अटक झाली होती. या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या ‘एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक’ या कंपनीवर छापा टाकण्यात आला. तेव्हा तिथून २ हजार कोटी रुपये किंमतीचे ‘एफिड्रिन’ हे ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा ममता कुलकर्णी यांचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याने तिलाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले. ममता कुलकर्णी आणि तिचा पती हे गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पसार झाले होते. मागच्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) हिला दिलासा दिला होता.

(हेही वाचा – Rajan Salvi यांचा शिवसेना उबाठा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’)

बदनामी करण्यासाठी आयते कोलीत  

यंदाच्या महाकुंभमध्ये अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे हिंदू धर्मातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या महाकुंभबाबत नकारात्मक चर्चा होऊ लागली आहे. इंस्टाग्रामचे इंफ्लून्सर हर्ष रिचारिया अमृत स्नानासाठी  जाणाऱ्या आखाड्याच्या प्रमुख संतांच्या रथावर जाऊन बसली होती आणि ती स्वतःला साध्वी म्हणू लागली, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियाने महाकुंभात आलेल्या लाखो साधू – संतांना सोडून माळा विकणारी मोनालिसा हिचे डोळे सुंदर दिसतात म्हणून तिला प्रसिद्धी देणे सुरु केले. महाकुंभच्या  पहिल्या टप्प्यापर्यंत एक वेळ अशी आली की, महाकुंभ म्हणजे हर्ष रिचारिया, मोनालिसा आहे का? आता त्यात अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांची भर पडली. कुंभमेळ्याचे आयोजन होण्यामागे जो उद्देश असतो, तो यामुळे बाजूला राहून सवंग प्रसिद्धीसाठी जे घटक या कुंभमेळ्यात येतात त्यांच्यामुळे हिंदू धर्मातील परंपरांची  बदनामी करण्यासाठी हिंदू धर्मविरोधी घटकांच्या हाती आयते कोलीत मिळते, हे दुर्दैव!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.