Mahakumbh 2025 : विदेशींनी जाणले महाकुंभ पर्वातील अमृत स्नानाचे महत्त्व

भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी संगमात स्नान केले. यानंतर गंगा पूजा आणि आरती करण्यात आली.

64
Mahakumbh 2025 : विदेशींनी जाणले महाकुंभ पर्वातील अमृत स्नानाचे महत्त्व
Mahakumbh 2025 : विदेशींनी जाणले महाकुंभ पर्वातील अमृत स्नानाचे महत्त्व
  • हिंदुस्थान पोस्ट ब्युरो

विदेशींना भारतीय संस्कृतीचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. भारतातील अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवर विदेशी पर्यटक भक्तीभावाने पूजा-पाठ करताना दिसतात. कुंभमेळ्यामध्येही भारतातील भाविकांसह अनेक विदेशी भाविकांनी अमृत स्नान केले आहे. कुंभमेळ्याला (Mahakumbh 2025) भेट दिलेले भाविक येथील आध्यात्मिकता, धार्मिकता आणि उत्तम व्यवस्थापन यांचे कौतुक करत आहेत. केवळ सामान्य भाविकच नव्हे, तर देशाच्या उच्चाधिकाऱ्यांनी आणि प्रतिनिधींनीही कुंभपर्वामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे.

WhatsApp Image 2025 02 09 at 3.16.37 PM

(हेही वाचा –  राहुल गांधींनी २०२९ ला माझ्याविरोधात विधानसभा लढवावी; मंत्री Chandrashekhar Bawankule यांचे खुले आव्हान)
१० देशांच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने केले अमृत स्नान

१६ जानेवारी २०२४ या दिवशीही १० देशांच्या २१ सदस्यीय आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने महाकुंभपर्वाला भेट दिली आहे. त्यांनी पवित्र त्रिवेणी संगमात अमृत स्नानही केले. याचे आयोजन केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. या शिष्टमंडळात फिजी, फिनलँड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि संयुक्त अरब अमिराती या १० देशांच्या सदस्यांचा समावेश आहे. (Mahakumbh 2025)

७७ देशांच्या ११८ राजदूतांचे संगमघाटावर स्नान

१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी ७७ देशांतील ११८ राजदूतांनी संगम घाटावर स्नान केले. अमेरिका, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, रशिया, स्वित्झर्लंड, जपान, न्यूझीलंड, जर्मनी, नेपाळ, कॅनडा यासह ७७ देशांतील ११८ राजदूतांचा यात समावेश आहे. या राजदूतांनी प्रयागराज महाकुंभ आणि तिथल्या व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक केले आहे. (Mahakumbh 2025)

(हेही वाचा – 31 Maoists killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २ जवान हुतात्मा)

भूतानच्या राजानेही केले संगमस्नान

भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (Jigme Khesar Namgyel Wangchuck) यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी संगमात स्नान केले. यानंतर गंगा पूजा आणि आरती करण्यात आली.

WhatsApp Image 2025 02 09 at 3.16.38 PM

विदेशी नागरिकांनी स्नान केले; म्हणून कुंभपर्वाचे महत्त्व वाढते, असे नाही. तर पाश्चात्य वातावरणात राहूनही त्यांना कुंभस्नानाचे महत्त्व वाटते आणि भारतात मात्र कुंभमेळ्याच्या आयोजनावर टीका करणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे अनेक भारतीयांना गंगेच्या पावित्र्यापेक्षा तिच्या प्रदूषणाविषयी बोलण्यात धन्यता वाटते. त्याच पाश्चात्यांनी कुंभपर्वामध्ये संगमस्नान केल्यानंतर तरी तथाकथित पुरोगाम्यांचे डोळे उघडणार का? (Mahakumbh 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.