बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र सुरू केली आहे. यामध्ये मुंबईतील डोंगरी पोलिसांच्या (Dongri Police Station) १४ पथकांनी मुंबई ठाण्याच्या वेगवेगळ्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. याप्रकरणी आरोपींवर डोंगरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bangladeshi infiltrators)
मिळलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी रोजी मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये अवैधरित्या घुसखोरी (Bangladesh Trespassing) केलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी संबंधित तपास हा सहायक पोलीस निरीक्षक परिमल पाटील (API Parimal Patil) यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात येत होता. तसेच सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक माहितीवरुन मुंबई शहर व लगतचे परिसरात अवैध घुसखोर बांगलादेशी नागरिक राहायला आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त, डॉ. प्रविण मुंढे (DCP Dr. Praveen Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
यामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या परिमंडल १ अंतर्गत पोलीस ठाण्यातील १४ पथकाने मुंबई, ठाणे भागातील मानखुर्द, वाशी नाका, कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण, मुंब्रा, दारुखाना येथुन एकुण १६ घुसखोर बांगलादेशी यांचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २ घुसखोर बांगलादेशी यांच्यावर यापुर्वीही गुन्हा दाखल असल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांनी बांगलादेशींची धरपकड चालू केली असून जानेवारीत पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(हेही वाचा – प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! Mumbai Pune Expressway वरील ‘हा’ मार्ग सहा महिन्यांसाठी राहणार बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या)
यापूर्वी कल्याण परिमंडळातील कोळशेवाडी, महात्मा फुले चौक, मानपाडा, बाजारपेठ या पोलिस ठाण्यात पाच गुन्ह्यात ११ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात दोन बांगलादेशी नागरिक पकडले गेले आहेत. ठाणे शहरातील वर्तकनगर आणि कापुरबावडी ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोन बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही पाहा –