उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याला (Mahakumbh 2025) आतापर्यंत कोट्यावधी भाविकांनी भेट दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही त्रिवेणी संगमावर जाऊन अमृतस्नान केले. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही (Droupadi Murmu) दि. १० फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याला जाणार आहेत. राष्ट्रपती भवन कार्यालयातून ही माहिती मिळाली आहे.
( हेही वाचा : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! Mumbai Pune Expressway वरील ‘हा’ मार्ग सहा महिन्यांसाठी राहणार बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या)
दरम्यान प्रयागराज येथील त्यांच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) संगम येथे पूजा करून पवित्र स्नान करतील. अक्षयवट आणि हनुमान मंदिरात (Hanuman Temple) पूजा आणि दर्शन घेतील. तसेच डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देतील, असे राष्ट्रपती भवनाने (Rashtrapati Bhavan) दि. ९ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. संगम हे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचे संगम आहे. पौष पौर्णिमेला (१३ जानेवारी) सुरू झालेला महाकुंभ (Mahakumbh 2025) हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community