DCM Eknath Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात आरोग्य सेवांचा शुभारंभ

49
DCM Eknath Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात आरोग्य सेवांचा शुभारंभ
DCM Eknath Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात आरोग्य सेवांचा शुभारंभ

राज्यातील नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध आरोग्य सुविधा आणि योजनांचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात या योजनांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कल्याणकारी योजना माझ्या वाढदिवसानिमित्त जनतेसाठी उपयोगी पडत आहेत. माझ्या हातून या योजनांचे राज्यभर उद्घाटन होत आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. असेच काम राज्यातील जनतेसाठी होत राहो.”

या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – मुंबई, ठाण्यातील वेगवेगळ्या भागातून १६ Bangladeshi infiltrators ना अटक)

राज्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा विस्तार
  • कर्करोग निदान व उपचारासाठी सुविधा – राज्यातील नागरिकांना कर्करोग निदान व उपचार अधिक सोयीस्कर व्हावेत यासाठी ८ ठिकाणी अत्याधुनिक “कॅन्सर मोबाईल व्हॅन” कार्यान्वित करण्यात आल्या. या वाहनांद्वारे कर्करोग प्रतिबंधात्मक समुपदेशन, निदान आणि बायोप्सी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
  • केमोथेरपी केंद्रांचे लोकार्पण – अकोला, नाशिक, अमरावती, सातारा, पुणे, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बीड या ९ जिल्ह्यांमध्ये केमोथेरपी डे केअर सेंटर सुरू करण्यात आले. तसेच ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि वर्धा येथे नवीन केमोथेरपी युनिट्स कार्यान्वित करण्यात आल्या.
  • डिजिटल आरोग्य सुविधांचा समावेश – राज्यातील आरोग्य व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक समावेश करण्याच्या दृष्टीने डिजिटल हॅन्ड एक्स-रे मशीन आणि सीटी स्कॅन सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.
  • रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम – १०२ योजनेअंतर्गत ३८४ नवीन रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या, ज्यामुळे गरोदर माता आणि नवजात अर्भकांच्या सुरक्षित वाहतुकीस मदत होईल. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी ७ नवीन ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट (ALS) रुग्णवाहिका गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी आणि रायगड येथे तैनात करण्यात आल्या.

(हेही वाचा – Samruddhi Highway वरील प्रवाशांसाठी गुड न्यूज; ‘या’ २१ ठिकाणी मिळणार विशेष सुविधा )

२ कोटी महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम

राज्यातील महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी २ कोटी महिलांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब आणि इतर सर्वसाधारण तपासण्या करण्यात येणार आहेत. निदान झालेल्या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नव्या सुविधा

राज्यातील ३४ ग्रामीण जिल्हे, २२ महानगरपालिका आणि मुंबईतील २४ वॉर्डसाठी ८० डिजिटल पोर्टेबल हँड हेल्ड एक्स-रे मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे क्षयरुग्णांचे त्वरित निदान होऊन योग्य उपचार दिले जाणार आहेत.

आरोग्य सेवक आणि तज्ज्ञांचा सन्मान

कार्यक्रमादरम्यान दंतशल्य चिकित्सक, कर्करोग तज्ज्ञ, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॅन्सर केअर पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यभर आरोग्य सुविधांचा विस्तार

या सर्व योजनांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना अधिक सुलभ, आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या हस्ते या सर्व सेवांचे लोकार्पण आणि महिलांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.