Ind vs Eng, 2nd ODI : ३२ व्या एकदिवसीय शतकानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

Ind vs Eng, 2nd ODI : रोहितने ११९ धावा करत भारताला इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकून दिली

86
Ind vs Eng, 2nd ODI : ३२ व्या एक दिवसीय शतकानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
Ind vs Eng, 2nd ODI : ३२ व्या एक दिवसीय शतकानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना ४ गडी राखून जिंकत मालिकेत २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. पण, या सामन्यात भारतासाठी महत्त्वाचं ठरलं ते कर्णधार रोहित शर्माचं नेहमीच्या फटकेबाजी शैलीत केलेलं शतक. कटकच्या बाराबत्ती स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक होती. त्यामुळे इंग्लिश संघानेही इथं पहिली फलंदाजी करताना ३०४ धावा केल्या. आणि त्याला उत्तर देताना रोहितची बॅट अशी काही तळपली की, पहिल्या ६ षटकांतच आपला इरादा स्पष्ट केला. खराब फॉर्म आणि निवृत्तीच्या चर्चेला त्याने सरळ बॅटने उत्तर दिलं. (Ind vs Eng, 2nd ODI)

(हेही वाचा- MahaKumbh 2025: प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर; प्रयागराज रेल्वेस्थानक केले बंद)

९० चेंडूंत ११९ धावा करताना त्याने ७ षटकारांची आतषबाजी बाराबत्ती स्टेडिअमवर केली. त्याबरोबर १२ चौकारही लगावले. त्यामुळे खरं म्हटलं तर ११९ पैकी त्याच्या ९० धावा या १९ चेंडूंतच झालेल्या आहेत. सामनावीराचा पुरस्कार तर रोहीतला मिळालाच. पण, तो स्वीकारताना रोहित काहीसा भावूक झाला होता. ‘शेवटपर्यंत फलंदाजी करण्याच्या इराद्यानेच खेळलो,’ असं तो म्हणाला. (Ind vs Eng, 2nd ODI)

 रोहितच्या बरोबरीने शुभमन गिलने ६० तर श्रेयस अय्यरने ४४ धावा केल्या. अक्षर पटेल ४१ धावांवर नाबाद राहिला. ‘आज फलंदाजी करताना मजा आली. आणि आतून खूप छान वाटत होतं. कशी फलंदाजी करायची याची योजना आखूनच मी खेळलो. मला टी-२० पेक्षा संथ आणि कसोटीपेक्षा थोडी जलद फलंदाजी करायची होती. मी फलंदाजीचे टप्पे स्वत:साठी आखून घेतले. आणि त्याप्रमाणे फलंदाजी केली. जितकं शेवटपर्यंत खेळता येईल, तितकं खेळण्याचा माझा प्रयत्न होता,’ असं रोहित म्हणाला. (Ind vs Eng, 2nd ODI)

(हेही वाचा- Population Jihad : केरळमध्ये १३ वर्षांत मुस्लिमांची लोकसंख्या हिंदुंच्या तुलनेत पाचपट वाढली)

शुभमन आणि श्रेयस यांच्या जबाबदार फलंदाजीचंही त्याने कौतुक केलं. आणि उत्तरोत्तर आणखी चांगला आणि सकस खेळ करण्याचा मनोदय बोलून दाखवला.  (Ind vs Eng, 2nd ODI)

 ७ षटकार खेचताना रोहितने एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. गेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३१ षटकार खेचले होते. आता रोहीतच्या षटकारांची संख्या ३३८ झाली आहे. या बाबतीत पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी ३५१ षटकारांसह आघाडीवर आहे. भारतीय संघाने कटकमधील सामना जिंकून मालिकेत २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना १२ तारखेला अहमदाबादला होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होईल. (Ind vs Eng, 2nd ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.