-
ऋजुता लुकतुके
कटक इथं रविवारी झालेल्या सामन्यापूर्वी सकाळी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये वेगळंच वातावरण होतं. विराट कोहली संघात येणार म्हटल्यावर बाहेर कोण जाणार याची चर्चा सुरू असतानाच मैदानात एका छोटेखानी समारंभाला सुरुवात झाली. आणि हा कार्यक्रम होता फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला भारतीय कॅप प्रदान करण्याचा. म्हणजेच वरुण चक्रवर्ती भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करणार होता. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या हस्ते त्याला ही कॅप प्रदान करण्यात आली. आणि त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती बनला भारताच्या एकदविसीय संघात पदार्पण करणारा वयाने सगळ्यात मोठा खेळाडू. ३३ वर्षं आणि १६४ दिवसांचा असताना वरुणच्या कारकीर्दीत हा क्षण आला आहे. आणि त्यामुळेच ही आठवण जन्मभर जपणार असल्याचं वरुणने म्हटलं आहे. यापूर्वी हा विक्रम फारुख इंजिनिअर यांच्या नावावर होता. ते आपला पहिला एकदिवसीय सामना खेळले ते ३६ वर्षं आणि १३८ दिवसांचे असताना. पण, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कारण, १९७४ मध्ये भारतीय संघ आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. आणि कसोटीत तोपर्यंत संघाचा अविभाज्य भाग असलेले इंजिनिअर ३६ वर्षांचे होते हा योगायोग होता. याच सामन्यात भारताकडून ३३ वर्षं आणि १०३ दिवसांचे असलेले अजित वाडेकरही खेळले होते. (Ind vs Eng, 2nd ODI)
Debut 🧢 ✅
Varun Chakaravarthy will make his first appearance for #TeamIndia in an ODI ✨
Updates ▶️ https://t.co/NReW1eEQtF#INDvENG | @IDFCFIRSTBank | @chakaravarthy29 pic.twitter.com/TRah0L7gh9
— BCCI (@BCCI) February 9, 2025
३३ व्या वर्षी वरुणला टी-२० खेळण्याचीही संधी मिळाली आहे. आणि इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत १४ बळी मिळवल्यानंतर त्याची एकदिवसीय मालिकेतही वर्णी लागली. आंतरराष्ट्रीय संधी फारशी मिळाली नसली तरी ए श्रेणीच्या सामन्यांत वरुणची सरासरी १४.१३ इतकी कमी आहे. आणि त्याने १०० हून जास्त बळी मिळवले आहेत. वरुण चक्रवर्तीच्या समावेशामुळे कुलदीप यादवला बाहेर बसावं लागलं. वरुणने १० षटकांत ५४ धावा देत १ बळी मिळवला. (Ind vs Eng, 2nd ODI)
(हेही वाचा- मुंबई महानगरात विकसित होणार १९ नवीन आर्थिक केंद्रे; MMRDA चा मास्टर प्लॅन)
भारताकडून वयाची तिशी ओलांडल्यानंतर पदार्पण करणारे खेळाडू पाहूया,
फारुख इंजिनिअर – ३६ वर्षं १३८ दिवस (१९७४, इंग्लंड)
वरुण चक्रवर्ती – ३३ वर्षं १६४ दिवस (२०२५, इंग्लंड)
अजित वाडेकर – ३३ वर्षं १०३ दिवस (१९७४, इंग्लंड)
दिलीप दोशी – ३२ वर्षं १५० दिवस (१९८०, ऑस्ट्रेलिया)
सय्यद अबिद आली – ३२ वर्षं ३०७ दिवस (१९७४, इंग्लंड)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community