Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचं पुनरागमन लांबलं, बंगळुरूत २-३ दिवसांचं रिहॅबिलिटेशन

Jasprit Bumrah : चॅम्पियन्स करंडकासाठी बुमराची अनिश्चितता कायम आहे

53
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचं पुनरागमन लांबलं, बंगळुरूत २-३ दिवसांचं रिहॅबिलिटेशन
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचं पुनरागमन लांबलं, बंगळुरूत २-३ दिवसांचं रिहॅबिलिटेशन
  • ऋजुता लुकतुके 

स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह आता बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत पुढचे २ ते ३ दिवस असणार आहे. आणि तिथे तो दुखापतीतून सावरण्यासाठीचे रिहॅब व्यायाम करणार आहे. एमआरआय स्कॅनच्या अहवालानंतर बुमराहला आता हलका व्यायाम सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे. आणि बुमराह आणखी काही दिवस बंगळुरूमध्येच वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल. पुढच्या १ ते २ दिवसांत तो व्यायामशाळेतील काही व्यायाम तसंच थोडी नेट गोलंदाजी करणार आहे. चॅम्पियन्स करंडकासाठी संघात बदल करण्याची अंतिम मुदत ही ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत आहे. आणि त्यासाठी दुबईतील स्थानिक वेळ गृहित धरली जाणार आहे. तोपर्यंत वाट बघण्याचं बीसीसीआयचं धोरण स्पष्टपणे दिसत आहे. (Jasprit Bumrah)

(हेही वाचा- मुंबई महानगरात विकसित होणार १९ नवीन आर्थिक केंद्रे; MMRDA चा मास्टर प्लॅन)

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला तेव्हाही बीसीसीआयने असंच धोरण ठेवलं होतं. ‘बुमराहच्या खेळण्याची १ टक्के जरी शक्यता असेल तरी बीसीसीआयची वाट बघण्याची तयारी आहे. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकादरम्यानही तसंच केलं होतं. प्रसिद्ध कृष्णाची बदली खेळाडू म्हणून निवड अगदी शेवटच्या क्षणी झाली होती. आता तर प्रश्न बुमराहचा आहे. आणि संघात बदल करण्याची मुदत टळून गेली तरी स्पर्धेच्या तांत्रिक समितीकडे बदली खेळाडूची मागणी करताच येते. त्यामुळे, या मार्गाची चाचपणीही बीसीसीआयकडून सुरू असणार आहे,’ बीसीसीआयमधील सूत्राने वृत्तसंस्थांना ही माहिती दिली आहे. (Jasprit Bumrah)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराहला पाठदुखी जडली. दुसऱ्या डावांत तो गोलंदाजी करू शकला नाही. आणि तिथून भारतात परतल्यानंतर ५ आठवडे त्याला जवळ जवळ बेड रेस्ट सांगण्यात आली होती. त्यानंतर तो बंगळुरूमध्ये पुन्हा एकदा स्कॅन तपासणीसाठी दाखल झाला. बुमराहच्या दुखापतीचं नेमकं स्वरुप अजूनही मीडियाला सांगण्यात आलेलं नाही. त्याबद्दल बीसीसीआयकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. आणि आता त्याच्या चॅम्पियन्स करंडकातील सहभागाबद्दलही बीसीसीआय गप्पच आहे. (Jasprit Bumrah)

(हेही वाचा- Mahakumbh 2025 : विदेशींनी जाणले महाकुंभ पर्वातील अमृत स्नानाचे महत्त्व)

आधी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बुमराचं नाव होतं. आणि हर्षित राणा त्याचा बदली खेळाडू होता. आता हर्षित राणाने नियमित खेळाडू म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. चॅम्पियन्स करंडकासाठीही बुमरा तंदुरुस्त नसेल तर हर्षितच दावेदार आहे. तसंच वरुण धवनचाही विचार पुन्हा एकदा होऊ शकतो, असं कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. (Jasprit Bumrah)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.