Ind vs Eng, 2nd ODI : रोहितचा मैदानातच चढला पारा, हर्षितला म्हणाला …

Ind vs Eng, 2nd ODI : हर्षितकडून गेलेल्या ओव्हरथ्रोमुळे रोहित त्याच्यावर चिडला

102
Ind vs Eng, 2nd ODI : रोहितचा मैदानातच चढला पारा, हर्षितला म्हणाला ...
Ind vs Eng, 2nd ODI : रोहितचा मैदानातच चढला पारा, हर्षितला म्हणाला ...
  • ऋजुता लुकतुके 

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना कटकच्या बाराबत्ती स्टेडिअमवर रविवारी पार पडला. भारतीय संघाने हा सामना जिंकून मालिकेतही २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. सामन्यात इंग्लंडने पहिली फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ३०४ धावा केल्या. इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माचा पारा चढला तो युवा गोलंदाज हर्षित राणाच्या एका कृतीने. इंग्लंडची अवस्था ३ बाद १७३ असताना हर्षितने आपल्याच गोलंदाजीवर चेंडू तटवला. पण, आक्रमकपणे तो पुन्हा फलंदाजाच्या दिशेनं फेकला. त्यामुळे बाईजच्या ४ धावा इंग्लंडला मिळाल्या. हे दूरून पाहणारा रोहित संतापला. आणि हर्षितकडे चालत आला. ‘डोकं कुठेय तुझं?’ असं म्हणत रोहितने आपला राग व्यक्त केला. (Ind vs Eng, 2nd ODI)

 हर्षित ३२ व्या षटकांत गोलंदाजीला आला तेव्हा पहिल्या ४ चेंडूंवर त्याने एकही धाव दिली नव्हती. जोस बटलर फलंदाजी करत होता. पाचवा चेंडू बटलरने हर्षितकडेच तटवला. आणि तो क्रिझमध्ये उभा होता. तरीही हर्षितने चेंडू जोरात बटलरच्या दिशेनं मारला. तिथे यष्टीरक्षकाव्यतिरिक्त क्षेत्ररक्षक नव्हता. त्यामुळे चेंडू सीमारेषेपार निघून गेला. (Ind vs Eng, 2nd ODI)

(हेही वाचा- Ind vs Eng, 2nd ODI : वरुण चक्रवर्ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सगळ्यात वयस्कर क्रिकेटपटू)

 रोहित शर्माचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात रोहित हर्षितला ‘तुझं डोक ठिक आहे ना?’ असं विचारताना दिसतो. हर्षितने त्यावर काही उत्तर दिलं नाही. आणि तो गोलंदाजीसाठी निघून गेला. हर्षितची या सामन्यात धुलाई झाली. ९ षटकांत ६३ धावा देत त्याने एक बळी मिळवला. (Ind vs Eng, 2nd ODI)

 कटकच्या या सामन्यात भारताने ४ गडी राखून विजय मिळवला. रोहित शर्माने तडाखेबंद फलंदाजी करताना ९० चेंडूंत ११९ धावा केल्या. यात त्याने ७ षटकार आणि १२ चौकारांची आतषबाजी केली. मालिकेतही भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना १२ तारखेला अहमदाबादला होणार आहे. (Ind vs Eng, 2nd ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.