![Ind vs Eng, 2nd ODI : भारत - इंग्लंड सामन्यादरम्यानच्या फ्लडलाईट व्यत्ययावर ओडिशा क्रिकेट असोसिएशनकडे मागितली दाद Ind vs Eng, 2nd ODI : भारत - इंग्लंड सामन्यादरम्यानच्या फ्लडलाईट व्यत्ययावर ओडिशा क्रिकेट असोसिएशनकडे मागितली दाद](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-10T145902.396-696x377.webp)
-
ऋजुता लुकतुके
रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरू असताना संध्याकाळी फ्लडलाईट्स बंद पडल्यामुळे व्यत्यय आला होता. रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजी करताना फ्लडलाईटचा एक टॉवर बंद पडल्यामुळे सामना ३५ मिनिटं थांबवावा लागला. या व्यत्ययासाठी ओडिशाचे क्रीडामंतरी सूर्यबंशी सूरज यांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशनकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. बाराबत्ती स्टेडिअमवर हा सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री मोहन चरण मांझी तसंच मंत्रिमंडळातील काही महत्त्वाचे सदस्य हजर होते. सूरजही त्यावेळी मैदानावर होते. सामन्यानंतर त्यांनी क्रिकेट मंडळाकडे झाल्या प्रकाराचं स्पष्टीकरण मागितल्याचं सांगितलं. (Ind vs Eng, 2nd ODI)
(हेही वाचा- Delhi निकालानंतर Shiv Sena UBT चे धाबे दणाणले; आघाडीसाठी लांगूलचालन!)
क्रिकेट मंडळाचे सचिव संजय बेहरा यांनी मात्र प्रत्येक टॉवरला दोन जनरेटर जोडलेले होते, असं म्हटलं आहे. ‘आम्ही त्या फ्लडलाईट टॉवरला दोन जनरेटर जोडले होते. एक जनरेटर काम करेनासा झाला तेव्हा आम्ही दुसरा जोडण्याची प्रक्रिया सुरू केली. पण, दुसरा जनरेटर थोडा लांब होता. तिथे खेळाडूंची बस उभी होती. ती हटवून जनरेटर पुढे आणण्यासाठी वेळ गेला,’ असं बेहरा यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. (Ind vs Eng, 2nd ODI)
Floodlight glitch disrupts India-England match at Cuttack Barabati, fans disappointed#Cuttack #Odishahttps://t.co/GF61i0EGSw
— OTV (@otvnews) February 9, 2025
बाराबत्ती स्टेडिअम हे ओडिशातील ऐतिहासिक मैदान आहे. आणि इथं नियमितपणे आंतरराष्ट्रीय सामने होतात. यापूर्वी जून २०२२ मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० सामना या मैदानावर खेळवण्यात आला होता. फलंदाजांना मदत करणारं मैदान अशी या मैदानाची ख्याती आहे. ओडिशा क्रिकेट असोसिएशननेही झाल्या प्रकाराची नि:पक्ष चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. (Ind vs Eng, 2nd ODI)
(हेही वाचा- world pulses day : १० फेब्रुवारीला का साजरा केला जातो जागतिक कडधान्य दिन?)
सामना बंद झाल्यानंतर लय सापडलेला रोहीत शर्मा आणि शुभमन गिल यांनी फलंदाजी सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, पंचांनी सामना बंद करण्याचा निर्णय घेतला. हा व्यत्यय सोडल्यास सामन्यात एकूण ६१२ धावांचा पाऊस पडला. आणि रोहीत शर्माने ९० चेंडूंत ११९ धावा करत भारताला हा सामना जिंकून दिला. रोहीत फॉर्ममध्ये परतल्यामुळे चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. (Ind vs Eng, 2nd ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community