chyawanprash खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात? चला जाणून घेऊया

51
chyawanprash खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात? चला जाणून घेऊया

आयुर्वेदात च्यवनप्राश (chyawanprash) हे विशेष गुणकारी मानलं गेलं आहे. ते तयार करण्यासाठी आवळा आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची गुणकारी फळं, रासायनिक द्रव्य, रक्ताचं शुद्धीकरण द्रव्य तसंच शरीरातले वात, कफ आणि पित्त असे तीनही दोष दूर करणारी औषधी द्रव्य वापरली जातात.

च्यवनप्राश (chyawanprash) खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच अनेक आजारांना तोंड देण्यासाठी शरीर तयार होते. च्यवनप्राश हे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांसाठीच खूप लाभदायक आहे. असं हे च्यवनप्राश आणखी गुणकारी व्हावं म्हणून ते तयार करण्यासाठी लागणारे सर्व घटक हे सर्वोत्तम प्रतीचेच असायला हवेत. याव्यतिरिक्त च्यवनप्राश तयार करण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीनेच तयार केलं गेलं पाहिजे.

च्यवनप्राश (chyawanprash) तयार करण्यासाठी लागणारा आवळा हा मुख्य घटक मानला जातो. आवळा हे फक्त फळ नसून उत्कृष्ट प्रतीचं आणि सहज सापडणारं एक आयुर्वेदिक औषध आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये आवळ्याला वयःस्थापन द्रव्य असं म्हणतात. त्यामुळे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज कमी होते आणि तारुण्य टिकून राहण्यासाठी मदत होते. आवळ्याचे इतरही अनेक औषधी गुणधर्म आहेत. म्हणूनच आयुर्वेदाचार्य आपल्या दैनंदिन आहारात आवळ्याचा समावेश करायला सांगतात.

(हेही वाचा – nashik famous temple : चला भाविकहो, नाशिक इथल्या प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन घेऊया)

आज आम्ही तुम्हाला च्यवनप्राश (chyawanprash) खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात :

च्यवनप्राश खाण्यासाठी कोणते नियम आहेत?

काही लोकांना असं वाटतं की, फक्त हिवळ्यातच च्यवनप्राश (chyawanprash) खावं. पण हा खूप मोठा गैरसमज आहे. खरंतर च्यवनप्राश हे संपूर्ण वर्षभर खाता येतं. पण मात्र च्यवनप्राश खाताना खाणाऱ्या व्यक्तीच्या वयानुसार ते खाल्लं जायला हवं. १ ते ५ वयोगटातल्या मुलांना पाव चमचा, ६ ते १० वयोगटातल्या मुलांना अर्धा चमचा आणि १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना १ चमचा अशाप्रकारे च्यवनप्राश रोज खायला द्यावं. वयाच्या पस्तिशीनंतर च्यवनप्राशमध्ये रजत, सुवर्ण असे धातू मिसळून तयार केलेलं च्यवनप्राश खाणं चांगलं असतं. गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनीही च्यवनप्राश खावं.

च्यवनप्राश खाण्यासाठी योग्य वेळ कोणती?

आयुर्वेद शास्त्रामध्ये च्यवनप्राश हे सकाळी प्राशन करणं हे सर्वोत्तम मानलं जातं. आयुर्वेदाचार्य च्यवनप्राश (chyawanprash) सकाळच्या वेळी अनशा पोटी खाण्याचा सल्ला देतात. नाश्ता करण्याआधी एक चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत खाल्लं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. तसंच झोपण्याआधीही १ चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेऊ शकता.

(हेही वाचा – Delhi निकालानंतर Shiv Sena UBT चे धाबे दणाणले; आघाडीसाठी लांगूलचालन!)

च्यवनप्राश खाल्ल्यामुळे कोणकोणते फायदे होतात?
  • च्यवनप्राशमध्ये (chyawanprash) जीवनसत्व अ आणि जीवनसत्व क चं प्रमाण जास्त असतं. च्यवनप्राश नियमित खाल्ल्याने सर्दी, पडसे, खोकला यांसारखे फुफ्फुसांचे आजार होत नाहीत.
  • च्यवनप्राश हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
  • च्यवनप्राश रोज खाल्लं तर अन्नपचन नीट होते.
  • च्यवनप्राशमध्ये आवळा हा मुख्य घटक असल्यामुळे ते तारुण्यवर्धक आणि बुद्धिवर्धकही असतं.
  • च्यवनप्राशचं (chyawanprash) सेवन केल्याने श्वसनाच्या तक्रारी कमी होतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • च्यवनप्राश हे स्त्रियांमधल्या मासिक पाळीच्या समस्या दूर करतं आणि पाळी नियमित करायला मदत करतं.
  • च्यवनप्राश रोज खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रित राहतं, शरीरातलं रक्तशुद्ध होतं, हीमोग्लोबिन वाढतं आणि शरीराचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.