Uttar Pradesh मध्ये प्रशासनाच्या जमिनीवर अवैध मशिदीचे बांधकाम

64
Uttar Pradesh मध्ये प्रशासनाच्या जमिनीवर अवैध मशिदीचे बांधकाम
Uttar Pradesh मध्ये प्रशासनाच्या जमिनीवर अवैध मशिदीचे बांधकाम

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगर (Kushinagar) जिल्ह्यात दि. ९ फेब्रुवारी रोजी प्रशासनाने अवैध बांधकाम मशीद मदनी जमिनदोस्त केली आहे. मशिदीचा (Mosque) नकाशा मंजुर नसल्याने आणि त्यातील काही भाग पोलीस ठाणे आणि नगरपालिकेच्या जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचे आढळून आले. यामुळे अवैध मशिदीवर (Mosque) बुलडोझरची कारवाई करण्यात आली.

( हेही वाचा : Mumbai International Airport : मुंबई विमानतळाची ड्रोन मार्फत रेकी, गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी चौकशी करण्यात आली होती. तपासादरम्यान मशीद समितीने तिन्ही नोटिसांना उत्तर दिले नाही. नकाशा सादर न केल्याबद्दल प्रशासनाने मशिदीवर (Mosque) कारवाईची नोटीस बजावली. त्यानंतर काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मशिदीवरील कारवाईसाठी ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. स्थगिती संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, प्रशासनाने पोलीस दल आणि अनेक बुलडोझरसह हता नगरमधील मदनी मशीद जमीनदोस्त केली आहे.

या मशिदीचे बांधकाम हे १९९९ मध्ये सुरु झाले होते. ज्यावेळी मशिद (Mosque) बांधण्यात येत होती, तेव्हा दोन मजील मशिदीची परवानगी देण्यात आली होती. मात्र मशीदीच्या बांधकामावेळी नियमावलीचा भंग करत त्यांनी दोन ऐवजी मशिदीत चार मजले आणि एक तळमजला बांधला. त्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे तक्रार केली आहे. तेव्हा त्यांनी प्रशासनास कारवाईचे आदेश दिले आहेत.

मशिदीच्या अवैध बांधकामावर प्रशासनाचे म्हणणे आहे की, मशिदीच्या नावावर कोणतीही एक जमीन नाही. कट्टरपंथी पक्षाच्या नावावर फक्त काही अंश जमीन आहे. तर उर्वरित २३ एकर महानगरपालिकेची (Municipal Corporation) जमीन ताब्यात घेत मशिदीच्या बांधकामात अवैध वाढ करण्यत आली. या प्रकरणी महापालिकेने याबाबत वारंवार इशारा दिला, परंतु मुस्लिम पक्षाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.