-
ऋजुता लुकतुके
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघ सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. लागोपाठ दोन मालिकांमध्ये झालेल्या पराभवामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतूनही भारतीय आव्हान संपुष्टात आलं. त्यावर उपाय म्हणून आता भारतीय संघ प्रशासन क्रिकेटच्या ३ प्रकारात तीन वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार करत असल्याचं समजतंय. रोहित शर्मा ३७ वर्षांचा आहे आणि तो यावर्षी निवृत्त होणार हे उघड आहे. अशावेळी त्याच्यानंतर वेगवेगळ्या कर्णधारांचं धोरण अवलंबलं जाऊ शकतं. (Indian Cricket Team)
क्रिकब्लॉगर या वेबसाईटने पहिल्यांदा ही बातमी दिली आहे. बीबीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने त्यांनी ही बातमी दिली आहे. आतापर्यंत बीसीसीआयने तीनही प्रकारात एकच कर्णधार असेल अशीच भूमिका घेतली होती. पण, गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर परिस्थिती काहीशी बदलली आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्माने या प्रकारातून निवृत्ती घेतली, त्यानंतर बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. (Indian Cricket Team)
(हेही वाचा – Mumbai International Airport : मुंबई विमानतळाची ड्रोनद्वारे रेकी, गुन्हा दाखल)
‘क्रिकब्लॉगर’शी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “भारताला लवकरच तिन्ही प्रकारांसाठी तीन कर्णधार मिळतील. कर्णधार कसे कामगिरी करतात हे पाहणे खूप मनोरंजक असेल.” (Indian Cricket Team)
संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना विराट कोहलीने पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघाची जबाबदारी घ्यावी असे वाटते, असे बातमीत म्हटले आहे. सध्या कोहली त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. पण, आता कोहली पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारतो की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. (Indian Cricket Team)
(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : भारत – इंग्लंड सामन्यादरम्यानच्या फ्लडलाईट व्यत्ययावर ओडिशा क्रिकेट असोसिएशनकडे मागितली दाद )
बातमीत म्हटले आहे की, प्रशिक्षक गौतम गंभीर यांना हार्दिक पांड्याने एकदिवसीय संघाची जबाबदारी घ्यावी असे वाटत आहे. गौतम गंभीरने चॅम्पियन्स करंडकासाठीही हार्दिकचा प्रस्ताव समोर ठेवला होता. पण, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा अशा दोघांनीही हा प्रस्ताव फेटाळला. (Indian Cricket Team)
सध्या सूर्यकुमार यादव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सूर्या कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. अशा परिस्थितीत, सूर्याचे टी-२० कर्णधारपदी राहणे निश्चित दिसते. “तीन प्रकारात तीन वेगवेगळे कर्णधार हा तसा नाजूक निर्णय आहे. पण, तो घेण्याची बोर्डाची तयारी आहे,” असं सूत्रांनी म्हटलं आहे. (Indian Cricket Team)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community