Mumbai Airport वर ८ कोटींचा गांजा जप्त, दोघांना अटक

103
Mumbai Airport वर ८ कोटींचा गांजा जप्त, दोघांना अटक
Mumbai Airport वर ८ कोटींचा गांजा जप्त, दोघांना अटक

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) वेगवेगळ्या पद्धतीने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशीच एक घटना मुंबई विमानतळाच्या सीमा शुल्क विभागाने (Customs Department) केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून सव्वा आठ किलो गांजा जप्त (Marijuana seized) केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सव्वा आठ कोटी रुपये आहे. दोेन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकॉकहून येणारे संशयीत प्रवासी तेथून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Mumbai Airport )

(हेही वाचा –Pune-Solapur Highway वर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत तीन ठार, १५ जखमी )

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार ०८ फेब्रुवारी रोजी बँकॉकहून आलेल्या सागर वधीया (Sagar Vadhiya) व निगम रावल (Nigam Rawal) या प्रवाशांना थांबवण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत संशयीत अमलीपदार्थ (Drugs) सापडला. त्यानंतर त्यांचे सामान तपासले. त्यावेळी सामानातील पाकिटांमध्ये संशयी अमलीपदार्थ सापडले. तपासणीत तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. सागरकडून चार किलो ६९ ग्रॅम गांजा, तर रावलकडून चार किलो ८९ ग्रॅम असा दोघांंकडून मिळून एकूण आठ किलो १५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सव्वा आठ कोटी रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्याने दिली. तसेच संबंधित पुढील तपास सीमा शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Mumbai International Airport : मुंबई विमानतळाची ड्रोनद्वारे रेकी, गुन्हा दाखल)

दरम्यान आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपींनी यापूर्वीही अशाप्रकारे गांजाची तस्करी केल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनी यापूर्वीही दोनवेळा अशा प्रकारे गांजाची तस्करी केली असून या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. दक्षिण अमेरिका खंडातील देशांमधून मोठ्याप्रमाणात या गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण होते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्ग मोठ्याप्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे दिसून आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्याप्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात विमानांची ये-जा असते. त्यामुळे बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी होत आहे.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.