टिकटॉक खरेदीबाबत Elon Musk यांनी अखेर दिलं उत्तर

47
टिकटॉक खरेदीबाबत Elon Musk यांनी अखेर दिलं उत्तर
टिकटॉक खरेदीबाबत Elon Musk यांनी अखेर दिलं उत्तर

ट्विटर (Twitter) ही लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी (social media company) विकत घेतल्यानंतर एलन मस्क हे टिकटॉक अॅप विकत घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.यावर आता एलन मस्क (Elon Musk) यांनी टिकटॉक (TikTok) विकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : Cycle Rally : दिल्ली ते पुणे सायकल मोहिमेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात

WELT Economic Summit मधील एका सत्रात एलन मस्क (Elon Musk) व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे सहभागी झाले. त्यात त्यांनी टिकटॉक खरेदी करण्याची योजना नसल्याचे सांगितले. एलन मस्क (Elon Musk) म्हणाले, “मी टिकटॉक (TikTok) वापरत नाही. या प्लॅटफॉर्मबद्दल मला जास्त माहिती नाही. खरंतर टिकटॉकसाठी मी कोणतीही बोली लावलेली नाही. ना माझ्याकडे हे खरेदी करण्यासंदर्भातील काही योजना आहे. जर माझ्याकडे टिकटॉक (TikTok) असते, तर मी त्याचे अल्गोरिदम समजून घेण्याचा प्रयत्न केला असता आणि हे बघितले असते की, ते किती हानिकारक आहे आणि किती उपयोगी आहे.”

पुढे ते (Elon Musk) म्हणाले की, “मग आम्ही त्याला उत्पादकता वाढवणारे आणि माणसांसाठी फायदेशीर बनवण्याच्या दिशेने काम केले असते. हानिकारक ठरण्याऐवजी कोणतीही गोष्ट अधिक फायदेशीर करण्याच्या बाजूने काम केले पाहिजे. मी व्यक्तिगत टिकटॉक (TikTok) वापरत नाही. त्यामुळे त्याबद्दल जास्त काही माहिती नाही.” “मला कधी कधी एक्सवर (ट्विटर) टिकटॉकचे व्हिडीओ दिसतात किंवा कुणीतरी मला दाखवतात. पण, मी ते खरेदी करण्याचा विचार करत नाहीये”, असे त्यांनी सांगितले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.