Dr. Neelam Gorhe यांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा

विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षणाचा शुभारंभ

48
Dr. Neelam Gorhe यांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा
  • प्रतिनिधी 

महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकसभेच्या प्रशिक्षण संस्थान PRIDE द्वारे आयोजित या कार्यक्रमात विधीमंडळीय मसुदा लेखन (लेजिस्लेटिव ड्राफ्टिंग) कौशल्य आणि संसदीय समित्यांच्या कार्यकुशलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

(हेही वाचा – Income Tax Bill : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाबरोबर महत्त्वाची बैठक)

संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक दिवसांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळ सदस्यांनी शून्य प्रहर, प्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रीय सहभाग घ्यावा, असा त्यांनी आग्रह व्यक्त केला.

सभागृहातील उपस्थिती शंभर टक्के असावी, संसद व विधीमंडळाच्या जुन्या चर्चांचा (डिबेट्स) अभ्यास करावा, तसेच विषयाचा सखोल अभ्यास करून प्रभावी लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सुचवले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ४३ आमदार उपस्थित होते, त्यापैकी ४ आमदार विधान परिषदेचे आणि उर्वरित विधानसभेचे होते. तसेच महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे जितेंद्र भोळे (सचिव-१) आणि विलास आठवले (सचिव-२) देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा समारोप मंगळवारी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

(हेही वाचा – टिकटॉक खरेदीबाबत Elon Musk यांनी अखेर दिलं उत्तर)

राज्यसभा सभापती व उपराष्ट्रपती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांची महत्त्वपूर्ण भेट

कार्यक्रमानंतर राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ आणि राज्यसभेतील सहकार्याबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली.

तसेच, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासोबतही डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी विशेष चर्चा केली. असंघटित कामगार, सामाजिक न्याय आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रश्नांवर राज्यसभेतून तोडगा कसा काढता येईल, यावर विचारविनिमय झाला.

राज्यसभेकडून महाराष्ट्राला कायम सहकार्य मिळेल, असे हरिवंश सिंह यांनी स्पष्ट आश्वासन दिले. तसेच, राज्यसभेचे कामकाज पाहण्याची संधी मिळाल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.