-
प्रतिनिधी
चेंबूर पोलीस ठाणे उडवून देण्याच्या निनावी कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. या कॉल नंतर बीडीडीएस (बॉम्ब शोधक पथक) ने संपूर्ण पोलिस ठाण्याची तपासणी केली असून पोलीस ठाण्यात किंवा आवारात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. सोमवारी सायंकाळी हा निनावी कॉल वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्याला आला होता. कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एटीएस आणि मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांचे पथक काम करीत आहे. (Fake Threat Call)
(हेही वाचा – शरद पवारांना मोठा धक्का, Jayant Patil भाजपाच्या संपर्कात ?)
वांद्रे रेल्वे (लोहमार्ग) पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षाला सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून चेंबूर पोलीस ठाणे बॉम्बने उडवून देऊ या आशयाची धमकी दिली. कॉल करणाऱ्याने स्वतःचे नाव न सांगता फोन कट केला. या निनावी कॉलनंतर तात्काळ मुंबई पोलिसांनी या निनावी कॉलची माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, श्वान पथक चेंबूर पोलीस ठाण्यात तपासणीसाठी पाठवून संपूर्ण पोलीस ठाण्याची तसेच पोलीस वसाहतीची तपासणी करण्यात आली असून कुठलीही आक्षेपार्ह तसेच संशयित वस्तू आढळून आलेली नाही. (Fake Threat Call)
(हेही वाचा – टिकटॉक खरेदीबाबत Elon Musk यांनी अखेर दिलं उत्तर)
कॉल करणारा चेंबूर पोलिसांकडून दुखावला गेला असावा, अथवा पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ केली असावी असा कयास लावला जात आहे. हा निनावी धमकीचा कॉल बोगस कॉल असल्याचे पोलिसांनी म्हटले असून कॉल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक तसेच एटीएस आणि वांद्रे रेल्वे पोलिसांचे पथक काम करीत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले. (Fake Threat Call)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community