राज्य सरकारच्या कोणत्याही जनहित योजना बंद नाहीत; मंत्री Uday Samant यांची माहिती

49
राज्य सरकारच्या कोणत्याही जनहित योजना बंद नाहीत; मंत्री Uday Samant यांची माहिती
  • प्रतिनिधी

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद करण्यात आल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. तसेच, तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील योजनांना ब्रेक लावल्याचा आरोपही होत होता. मात्र, राज्य सरकारने कोणतीही जनहित योजना बंद केलेली नाही, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले.

“रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारीच माझ्याकडे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची अयोध्यावारीची फाईल पाठवली होती, आणि ती मी मंजूर केली आहे,” असे उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलही चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत,” असे सामंत म्हणाले. “योजना आचारसंहितेच्या काळात लागू झाल्याने काही अर्जांची छाननी राहून गेली असू शकते. मात्र, चारचाकी वाहनधारक किंवा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जदारांना छाननीअंती वगळण्यात आले आहे. पण सर्वसाधारण कुटुंबातील पात्र भगिनींना ही योजना सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Indian Cricket Team : भारतीय संघाला तीन प्रकारांत ३ वेगवेगळे कर्णधार? विराटचं नावही चर्चेत)

उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी पत्र, पण नाराजी नाही

उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्योग विभागाच्या प्रधान सचिव आणि एमआयडीसीच्या सीईओ यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी “विभागाशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय माझ्या संमतीशिवाय घेऊ नयेत,” असे निर्देश दिले.

सामंत म्हणाले, “गेल्या काही काळात उद्योग विभाग व एमआयडीसीचे महत्त्वाचे निर्णय परस्पर घेतले जात आहेत. पूर्वी विकेंद्रित प्रशासनाद्वारे अनेक निर्णय घेतले जायचे. मात्र, आता हे अधिकार पुन्हा केंद्रीत करण्यात आले आहेत, त्यामुळे सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना मुंबईत हेलपाटे मारावे लागत आहेत. हा निर्णय का घेतला, याची कारणे स्पष्ट करावीत. तसेच, महत्त्वाच्या फाईल्स आणि निर्णयांबाबत मला माहिती द्यावी,” असे त्यांनी पत्रात नमूद केले.

(हेही वाचा – शरद पवारांना मोठा धक्का, Jayant Patil भाजपाच्या संपर्कात ?)

“ही नाराजी नाही, तर अपेक्षा”

पत्रातील मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “मी मंत्री म्हणून विभागाकडून काय अपेक्षा आहेत, हे सांगणे म्हणजे नाराजी नव्हे. कामकाजात पारदर्शकता असावी, हीच माझी भूमिका आहे.”

राज्यातील कोणतीही जनहित योजना बंद न करताच सरकारने त्या अधिक प्रभावी करण्यावर भर दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.