शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Ekanath Shinde) यांचा ०९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फोन करून मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण फोनवर काय बोलणं झालं यासंबंधी माहिती मिळाली नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी स्वत: याबाबत खुलासा केला. मोदींनी फोनवरुन आपुलकीने विचारपूस केली. तसेच वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह आणि राज्यपाल महोदयांचा देखील मला फोन आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)
माझ्या यशात ठाणेकरांचे मोठे योगदान
एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. राज्यात मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षाचा काळात पायाला भिंगरी लावून रात्रंदिवस काम केले. महाराष्ट्राचे (Maharashtra) सरकार कसे आहे हे सगळ्यांनी पाहिले, असे ते म्हणाले. मला तुम्ही लहानपणापासून पाहिले आहे. मी शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता आणि या राज्याच्या मुख्यमंत्री झालो. त्यामुळे किसन नगर आणि ठाणेकरांचे माझ्या यशात खूप मोठे योगदान असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले, रविवारी माझा वाढदिवस झाला, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मला फोन केला. काय शिंदेजी कुठे आहात? मी म्हणालो इथेच आहे. काय करतायात, आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… त्यांनी मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या. अमित शहा, उपराष्ट्रपती, गव्हर्नर सगळ्यांनीच मला शुभेच्छा दिल्या. मोदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर त्यांनी एकनाथ शिंदे यांची आठवण ठेवून मला फोन केला. तुमची साथ तर आहेच. मै भी तुम्हारे साथ हू… हे नाते निवडणुकी पुरते नाही, हे परमनंट नाते आहे, असे फोनवर मोदींशी बोलणे झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community