BMC : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला महापालिकेसमोर ‘हा’ पर्याय; उद्धव ठाकरेंचे स्वप्न भंगणार!

90
BMC : महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अभिजित शर्मा यांची होणार बदली?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

पावसाळ्यात अपुऱ्या पाणी साठ्यामुळे महापालिकेला कराव्या लागणाऱ्या पाणी कपातीवर मात करण्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. परंतु आता हाच प्रकल्प गुंडाळण्यात येणार असून याला पर्याय म्हणून मलजल शुद्धीकरण केंद्रातील उपलब्ध होणाऱ्या पाणी ठरणार आहे. या प्रकल्पातून शुद्ध केलेल्या पाण्यावर पुनर्शुद्धीकरण केले जाणार असून यातून प्रतिदिन ९७० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असल्याने समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव गुंडाळण्याचा विचार प्रशासनाने केल्याचे बोलले जात आहे. (BMC)

मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई आणि पिंजाळ प्रकल्पाला तिलांतली देत समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव महापालिकेने हाती घेत यासाठी मनोरी येथे २०० दशलक्ष लिटर क्षमतेचा आणि विस्तारीत ४०० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल पूर्ण करण्याचा अहवाल सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण केले. तसेच यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोली लावून निविदा मागवण्याचा प्रयत्न केला. परंतु याला प्रतिसाद न लाभल्याने आजवर हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकून पडला आहे. (BMC)

(हेही वाचा – Lake digitalization: मत्स्य व्यवसाय वाढीसाठी मोठं पाऊल! आता तलावाचे होणार ‘डिजिटलायझेशन’   )

परंतु आता या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग सापडला असून अलिकडच्या काळात अनियमित पावसामुळे मुंबईतील नागरिकांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्याकरिता व मागणी आणि पुरवठ्यातील तूट कमी करण्याकरिता मुंबईत निर्माण होणाऱ्या मलजलावर आधुनिक प्रक्रिय करण्यासाठी विविध ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातून ५० टक्के मलजलावर तृत्तीय स्तरावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे या हा पाणी पुरवठा करण्यासाठी धारावी ते घाटकोपर आणि पुढे भांडुप संकुल पर्यंत ९७० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा जमिनीखालील बोगद्याच्या काम हाती घेतले आहे. याच्या कामालाही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे यातून मिळणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच अन्य वापरासाठी करण्यात येणार असल्याने महापालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत होणार असून त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची गरज पूर्ण करणे शक्य होईल. (BMC)

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव खर्चिक असल्याने मलजल शुध्दीकरण प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या पाण्याचे पुन्हा शुद्धीकरण करून ते पाणी पिण्यायोग्य वापरासाठी वापरण्याचाही विचार आहे, त्यामुळे निश्चित महापालिकेच्या पाणी पुरवठ्यात वाढ होईल, त्यामुळे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव सध्या तरी गुंडाळला नसला तरी जर याला प्रतिसाद न लाभल्यास हा प्रस्ताव गुंडाळावाच लागणार असून आता यासाठी मलजल शुद्धीकरणातील पाण्याचा पर्याय प्राप्त झाल्याने ते शक्य असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.