BMC: आठ ते नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला हस्तांतरीत झालेल्या त्या पडीक वास्तूत रंगणार नाटकांचे प्रयोग

65

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत आरक्षण समायोजनाअंतर्गत विकासकांकडून बांधीव इमारत महापालिकेला (Mumbai Municipality) हस्तांतरीत झाल्यानंतरही त्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने आजही या वास्तू धुळखात पडल्या आहेत. अशाचप्रकारे नाट्यगृहाच्या दोन वास्तू वडाळा (Wadala) आणि घाटकोपर (Ghatkopar) पूर्व विभागांत आठ ते नऊ वर्षांपासून महापालिकेला हस्तांतरीत झाल्या होत्या. परंतु त्या नाट्यगृहाच्या इमारतींचा वापर महापालिकेने न केल्याने या वास्तू आता पडिक बनल्या असून आता याच नाट्यगृहांचे नुतनीकरण करून महापालिका ही  लघु नाट्यगृहे (Miniature theatres) लोकांसाठी खुली करणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Tanaji Sawant यांचा मुलगा नाट्यमय घडामोडीनंतर परतला; नेमंक प्रकरण काय?)

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी (Dr. Bhushan Gagrani) यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वडाळा आणि घाटकोपर येथे लघु नाट्यगृहाच्या जागेचे नुतनीकरण करून त्यांचे लोकार्पण केले जाईल अशी घोषणा केली. ही दोन्ही नाट्यगृहे २५० आसन क्षमतेची असून सन २०१५-१६ मध्ये संबंधित विकासकाने महापालिकेला बांधून  महापालिका विभाग कार्यालयाला हस्तांतरीत केली आहे.

वडाळा येथे दोस्ती एकर्स ठिकाणी तर घाटकोपर पूर्व येथे जैन मंदिर शेजारी या नाट्यगृहाच्या इमारती महापालिकेला हस्तांतरीत झाल्या होत्या. परंतु या नाट्यगृहातील आसन क्षमता कमी असल्याने मोठ्या नाट्यगृहांसाठी या वास्तू उपलब्ध करून देता आल्या नाहीत. या वास्तूंमध्ये लिफ्टसह वातानुकुलित यंत्रणासह सुसज्ज अशा इमारती असल्या तरी मागील आठ ते नऊ वर्षांपासून या वास्तू बंद असल्याने त्या पडिक बनल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही वास्तूंचे स्टक्चरल ऑडीट (Structural Audit) तसेच इलेक्टीकल ऑडीट (Electical Audit) आणि साफसफाई आदींची कामे केली जाणार आहेत. त्यानुसार या नाट्यगृहाच्या इमारतींच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांनी Raj Thackeray यांचा गैरसमज दूर केला?)

त्यामुळे येत्या काही महिन्यांतच ही लघुनाट्यगृहे (Mini theatres) लोकांसाठी खुली केली जाणार आहे. तत्कालिन अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे (Commissioner Ashwini Bhide) यांनी पुढाकार घेवून या वास्तूंमध्ये लघु नाट्यगृहे सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही केली होती, त्यानुसार या विभागाने आता पुढील कार्यवाही पूर्ण झाल्याने येत्या दिवसांमध्ये ही लघु नाट्यगृहे बाल नाटकांसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे. या लघु नाट्यगृहांचा लाभ बाल नाटकांना (Drama) तसेच प्रायोगिक नाटकांच्या तालिमींकरता केला जावू शकतो.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.