MHADA च्या संक्रमण शिबिरांत बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात; पहिल्याच दिवशी १९५ भाडेकरूंचे सर्वेक्षण

953
MHADA च्या संक्रमण शिबिरांत बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात; पहिल्याच दिवशी १९५ भाडेकरूंचे सर्वेक्षण
MHADA च्या संक्रमण शिबिरांत बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात; पहिल्याच दिवशी १९५ भाडेकरूंचे सर्वेक्षण

म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर व उपनगरांतील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. सहकार नगर चेंबूर (Chembur) येथील वसाहतीतील संक्रमण शिबिरातील सुमारे १९५ भाडेकरु/रहिवासी यांचे दि. १० फेब्रवारी रोजी बायोमेट्रिक सर्वेक्षण (Biometric Survey) यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. (MHADA)

( हेही वाचा : BMC : महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अभिजित शर्मा यांची होणार बदली?

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर (Mumbai city) व उपनगरात एकूण ३४ ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय १३ सप्टेंबर २०१९ नुसार संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांचे अ, ब व क प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाने बायोमेट्रिक सर्वेक्षण करून संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे वर्गीकरण करण्यासंदर्भात कळविले होते. या शासन निर्देशानुसार म्हाडामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाला रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (MHADA)

११ फेब्रुवारी २०२५ रोजी सहकार नगर, चेंबुर वसहतीतील संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांच्या मागणीनुसार बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १२ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत गोरेगाव पूर्व येथील बिंबिसार नगरमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बिंबिसारनगर नंतर उर्वरित वसाहतीमधील इमारतीमध्ये राहणा-या भाडेकरु तथा रहिवासी यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार असून संक्रमण शिबिरातील सर्व गाळेधारक भाडेकरू / रहिवासी यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम म्हाडाने योजिले आहे. (MHADA)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.