महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची (HSC Board Exam) परीक्षा आज, मंगळवार ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. (12th board exam 2025) परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा – BMC: आठ ते नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला हस्तांतरीत झालेल्या त्या पडीक वास्तूत रंगणार नाटकांचे प्रयोग)
मुंबईतून ३ लाख विद्यार्थी देणार परीक्षा
मुंबई (Mumbai) विभागातून नियमित ३,२५,५७१ विद्यार्थ्यांसह एकूण ३,४२,०१२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे एक लाख ६६ हजार ४२९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल विज्ञान शाखेचे १ लाख २७,७०४ विद्यार्थी आणि कला शाखेचे ४७,८७९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे.
गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर यंत्रणा
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग (GPS live tracking) होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे. (copy mukt abhiyan)
ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास ते केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. २०१८ पासून जे गैरप्रकार घडले, त्या केंद्रावरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई बदलले आहेत. या केंद्रांवर तटस्थ शाळेचे स्टाफ नियुक्त करण्यात आले. या वर्षी परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल. (HSC Board Exam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community