Dahisar Toll Plaza : … तर टोलनाका फोडणार; वाहतूक कोंडीवरील उपाययोजना न केल्याने परिवहनमंत्री संतापले

Dahisar Toll Plaza : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना न केल्याने परिवहनमंत्री Pratap Sarnaik संतापले

94
Dahisar Toll Plaza : ... तर टोलनाका फोडणार; वाहतूक कोंडीवरील उपाययोजना न केल्याने परिवहनमंत्री संतापले
Dahisar Toll Plaza : ... तर टोलनाका फोडणार; वाहतूक कोंडीवरील उपाययोजना न केल्याने परिवहनमंत्री संतापले

तुम्हाला सांगूनही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी काही केले नाही. आता येत्या शनिवारपर्यंतची शेवटची मुदत तुम्हाला देत आहे. मी आधी शिवसैनिक असून नंतर परिवहन मंत्री आहे. शनिवारपर्यंत आदेशांचे पालन केले नाही तर मी स्वतः टोलनाका फोडून टाकणार, अशा शब्दांत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी संताप व्यक्त केला. सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी दहिसर टोलनाक्याची (Dahisar Toll Plaza) पाहणी करून ठेकेदाराने काय काय उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला. या वेळी आरटीओचे मंगेश गुरव, मुंबई वाहतूक शाखेचे प्रमोद तावडे व मीरा-भाईंदर (Meera-Bhayander) वाहतूक शाखेचे सागर इंगोले आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – कोल्हापूर चित्र नगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना करणार; सांस्कृतिक कार्य मंत्री Ashish Shelar यांची माहिती)

अवजड मालवाहू वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांचा टोल माफ झाला, तरी नागरिकांचा वाहतूक कोंडीचा (traffic jam) त्रास मात्र अजून सुटलेला नाही. टोलनाका येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या गुरुवारी मंत्री सरनाईक यांनी महापालिका, पोलिस, आरटीओ व टोलनाका अधिकारी यांच्यासह पाहणी केली होती. तसेच काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, हे पाहून परिवहनमंत्री संतापले.

गेल्या गुरुवारी उपाययोजना सुचवतांना त्यांनी तातडीने रस्त्यावरील मुंबईकडे जाताना ३ व येताना २ रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. (dahisar toll traffic) आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूने ५०० मीटरपर्यंत लावण्यात यावेत. यामुळे वाहनधारकांना आपली वाहने शिस्तबद्ध रितीने संबंधित रांगेतून पुढे मार्गस्थ करणे शक्य होईल आणि वाहतूक कोंडी फुटेल, असे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले होते.

सरनाईक यांच्या या पवित्र्याने कोंडीचा सुटणार का, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.