Champions Trophy 2025 : भारताला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर रोहित, विराटला फॉर्म गवसायला हवा – मुरलीधरन 

45
Champions Trophy 2025 : भारताला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर रोहित, विराटला फॉर्म गवसायला हवा - मुरलीधरन 
Champions Trophy 2025 : भारताला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर रोहित, विराटला फॉर्म गवसायला हवा - मुरलीधरन 
  • ऋजुता लुकतुके 

चॅम्पियन्स करंडकातील भारताचं यश हे रोहित आणि विराटच्या फॉर्मवर अवलंबून असेल, असं श्रीलंकन स्टार खेळाडू मुथय्या मुरलीधरनला वाटतं. भारतातही या दोन दिग्गज खेळाडूंचा फॉर्म आणि त्यांचं संघासाठी योगदान यावर बरीच चर्चा सुरू आहे. रोहितने आधीच्या एकदिवसीय सामन्यात ९० चेंडूंत ११९ धावा करून आपली गमावलेली लय परत मिळाली असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. तर विराट कोहलीचं पर्थ कसोटीतील शतक सोडलं तर त्यानंतर त्याची कामगिरी समाधानकारक नाही. त्यामुळे भारतीय संघालाही या दोघांच्या फॉर्मचीच चिंता आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- कोल्हापूर चित्र नगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना करणार; सांस्कृतिक कार्य मंत्री Ashish Shelar यांची माहिती)

‘अर्थात, मोठ्या स्पर्धेत या दोघांच्या कामगिरीचीच चर्चा होणार. दोघं जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून संघाला अपेक्षाही असणार. फॉर्म तात्पुरता असतो. पण, खेळाडूंचं कौशल्य कायम त्यांच्याबरोबर राहतं. त्यामुळे कधी ना कधी तरी त्यांचा जलवा पाहायला मिळणारच,’ असंही मुरलीधरनने बोलून दाखवलं आहे. तो पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता. (Champions Trophy 2025)

स्पर्धा आशिया खंडात होत असल्यामुळे आशियाई संघांना या स्पर्धेत फायदा मिळेल असं त्याला वाटतं. ‘मुख्य फायदा आहे तो गोलंदाजांच्या बाबतीत. इथल्या वातावरणात चांगली गोलंदाजी करू शकतील असे गोलंदाज आशियाई संघाकडे आहेतच. आणि ते सामन्यात निर्णायक भूमिका बजावतील. फिरकी गोलंदाज ही स्पर्धा गाजवतील असं मला वाटतं,’ असं मुरलीधरन म्हणाला. आणि सर्व आशियाई संघातील फिरकीपटूंचं त्याने कौतुक केलं. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Dahisar Toll Plaza : … तर टोलनाका फोडणार; वाहतूक कोंडीवरील उपाययोजना न केल्याने परिवहनमंत्री संतापले)

‘भारताने तर ४ फिरकीपटूंची संघात निवड केली आहे. आणि युवा वॉशिंग्टन सुंदरही चांगली गोलंदाजी करतोय. तर अफगाणिस्तान संघातही दर्जेदार फिरकीपटू आहेत. त्यांचंच स्पर्धेवर वर्चस्व राहणार आहे,’ असं मत त्याने व्यक्त केलं. भारतीय संघात फिरकी आणि तेज गोलंदाजीचं चांगलं मिश्रण आहे. तसंच ते पाकिस्तानच्या संघातही आहे. त्यामुळे हे दोन संघ त्याला बलवान वाटतात. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.