Ind vs Eng, 3rd ODI : रोहित शर्माने या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

Ind vs Eng, 3rd ODI : सर्वात जास्त धावा करणारा सलामीवीर म्हणून रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे 

69
Ind vs Eng, 3rd ODI : रोहित शर्माने या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
Ind vs Eng, 3rd ODI : रोहित शर्माने या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके 

इंग्लंडविरुद्ध कटक एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली. आणि त्याने ९० चेंडूंत ११९ धावा करताना ७ षटकार आणि १२ चौकारांची आतषबाजी केली. एकदिवसीय प्रकारातील त्याचं हे ३२ वं शतक होतं. तर या खेळीदरम्यान आणखी एका विक्रमाच्या बाबतीत त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित आता सचिनला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : भारताला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर रोहित, विराटला फॉर्म गवसायला हवा – मुरलीधरन )

एकूण ३५४ सामन्यांत रोहितने आता सलामीला येऊन १५,४०४ धावा केल्या आहेत. आणि यात त्याची सरासरी आहे ४५.४३ ची. तर सचिन तेंडुलकरने ३४६ सामन्यांत १५,३३५ धावा केल्या होत्या. सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे विरेंद्र सेहवाग. त्याने ३२१ सामन्यांमध्ये १५,७५८ धावा केल्या आहेत. पण, रोहित आता त्याच्याही जवळ पोहोचला आहे. अर्थात, सचिन कारकीर्दीच्या सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करायचा. आणि कसोटीत त्याने कायम याच क्रमांकावर फलंदाजी केली. (Ind vs Eng, 3rd ODI)

सलामीवीर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा, 

१५,७५८ – विरेंद्र सेहवाग (३२१ सामने)

१५,४०४ – रोहित शर्मा (३५४)

१५,३३५ – सचिन तेंडुलकर (३४६)

१२,२५८ – सुनील गावसकर (२०२)

१०,८६७ – शिखर धवन (२६८)

(हेही वाचा- भाजपाचे मुख्यमंत्री Sheeshmahal मध्ये रहाणार नाहीत ?; दिल्ली भाजपाने केली ‘ही’ मागणी)

इतकंच नाही तर रोहित शर्मा आता सर्वाधिक एकदिवसीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या दहांत पोहोचला आहे. मात्र या यादीत सचिन तेंडुलकर त्याच्या कितीतरी पुढे आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)

सचिन तेंडुलकर – १८,४२६ धावा (४६३ सामने)

कुमार संगकारा – १४,२३४ धावा (४०४ सामने)

विराट कोहली – १३,९११ धावा (२९३ सामने)

रिकी पाँटिंग – १३,७०४ (३७५)

सनथ जयसूर्या – १३,४३० (४४५)
महेला जयवर्धने – १२,६५० (४४८)

इंझमाम उल हक – ११,७३९ (३७६)

जॅक कॅलिस – ११,५७९ (३२८)

सौरव गांगुली – ११,३६३ (३११)

रोहित शर्मा – १०,९८७ (२६७)

(हेही वाचा- Ministry Gate Entry: ‘फेस डिटेक्शन’ न झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची फेरनोंदणी)

याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित हिट-मॅन म्हणून प्रसिद्ध आहे तो त्याच्या षटकार मारण्याच्या हातोटीमुळे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितने ३३८ षटकार ठोकले आहेत. या बाबतीत त्याने ख्रिस गेल (३३१) मागे टाकलं आहे. तर शाहीद आफ्रिदी ३५८ षटकारांसह त्याच्या पुढे आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.