रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना सध्या पालकमंत्री नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून, विकासकामे रखडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयात दोन्ही जिल्ह्यांसाठी स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली. मात्र, या बैठकीतही काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. (Raigad)
(हेही वाचा- Ind vs Eng, 3rd ODI : ‘रणजी सामन्याचा फायदा झाला असं रवींद्र जडेजा का म्हणतो?)
रायगड जिल्ह्यासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भरत गोगावले उपस्थित राहिले नाहीत. याशिवाय, रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी देखील या बैठकीला हजेरी लावली नाही. आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी त्यांना निमंत्रण न मिळाल्याचे कारण दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री भरत गोगावले त्या दिवशी रायगडमध्येच होते, मात्र तरीही त्यांनी बैठक टाळली. (Raigad)
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन बैठकीसाठी मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना बोलावण्यात आले आहे. (Raigad)
पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्ह्यांच्या प्रशासनावर परिणाम होत असून, विकासकामांमध्ये दिरंगाई होत असल्याची तक्रार स्थानिक जनप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत आहे. यामुळे या दोन जिल्ह्यांसाठी तातडीने पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी वाढत आहे. दरम्यान, मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी या वादाचा ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. (Raigad)
(हेही वाचा- दिल्लीतील जेएनयूमध्ये मराठी अध्यासन सुरु होणार ?; मंत्री Uday Samant यांचे संकेत)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्यांचे नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत म्हणून अशा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, मंत्र्यांची अनुपस्थिती हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना पालकमंत्री केव्हा मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Raigad)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community