उद्योगाची कुळकथामध्ये मागच्या भागात आपण पाहिलं जमशेटजी टाटांनी टाटा समुहाची मूहूर्तमेढ कशी रोवली ते. पण, त्यांच्या हयातीत त्यांची नागपूरची अद्ययावत कापड गिरण आणि मुंबईतील हॉटेल ताज हे दोनच प्रकल्प उभे राहू शकले. परकीयांच्या राज्यांत अडचणी अनंत होत्या. आणि शेवटी १९०४ मध्ये जर्मनीत जमशेटजी टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. पण, उद्योगाची धुरा आपला मोठा मुलगा दोराबच्या हातात सोपवतच. आणि मग दोराब यांनी जमशेटजींचं पोलाद कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्प आणि इंडियन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ही तीनही उर्वरित स्वप्न पूर्ण केली, प्रसंगी पत्नी मेहरबाई यांचे दागिने गहाण टाकून…ती कशी ते या भागात पाहूया,
Join Our WhatsApp Community