![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-84-696x377.webp)
१४४ वर्षांनंतर आलेल्या महाकुंभयोगावर (MahaKumbh 2025) प्रयागराजच्या (Prayagraj) त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज येथे दाखल होत आहेत. अमृतस्नानाच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने सामान्य भाविकांचा ओढा मधल्या काळात भेट देण्याकडे आहे. १२ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी संगमस्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजच्या दिशेने आल्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी १.५७ कोटी भाविकांनी संगम येथे पवित्र स्नान केले. (traffic conjunction prayagraj)
(हेही वाचा – दिल्लीतील जेएनयूमध्ये मराठी अध्यासन सुरु होणार ?; मंत्री Uday Samant यांचे संकेत)
१५-१६ तास भाविक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. प्रयागराजच्या दिशेने येणाऱ्या सर्व ७ रस्त्यांवर वाहनांच्या १० ते २५ किलोमीटरच्या रांगा पहायला मिळत आहेत. वाराणसी (Varanasi), लखनऊ, कानपूर, रायबरेली, जौनपूर आणि कौशांबी येथून प्रयागराजला येणारे सर्व महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने आल्यामुळे पेट्रोल आणि गॅस स्टेशनवर लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांनाही अडचणी येत आहेत. भाविकांचे प्रसाधनगृह आणि खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकांनी पायी चालत संगमला पोहोचण्याचा निर्णय घेतला. भाविकांची प्रचंड गर्दी पाहता प्रशासनाने संगम रेल्वे स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने भाविकांना १५ फेब्रुवारीनंतर येण्याचे आवाहन केले आहे.
गर्दी टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भाविकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. प्रवाशांना लवकर प्रवास करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांना गर्दी टाळण्यासाठी सकाळी लवकर प्रवास सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी, प्रशासनाने भाविकांना १५ फेब्रुवारीनंतर प्रयागराजला येण्याची विनंती केली आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल. (MahaKumbh 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community