मुंबईत मागील काही दिवसांपासून आग (Fire) लागण्याच्या घटना वाढत आहेत. या आगींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ओशिवरा (Oshiwara) येथील फर्निचर मार्केटला (Furniture market) भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील रिलीफ रोडवर असलेल्या घास कंपाऊंडमध्ये सकाळी साडे ११ च्या सुमारास ही आग लागली.(Mumbai Fire)
(हेही वाचा – भाजपाचे मुख्यमंत्री Sheeshmahal मध्ये रहाणार नाहीत ?; दिल्ली भाजपाने केली ‘ही’ मागणी)
ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये आग, आकाशात धुराचे लोट
अंधेरी पश्चिमेतील असलेल्या ओशिवरा येथे एक मोठं फर्निचर मार्केट आहे. येथे फर्निचरची मोठ मोठी दुकानं आणि लाकडी गोडाऊन देखील आहे. या फर्निचर मार्केटमध्ये ही आग (Furniture market fire) लागली आहे. लाडकाचं गोडाऊन आणि फर्निचरचं सामान असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, आगीने सध्या रौद्र रुप घेतलं असून आगीचा मोठा भडका दिसून येत आहे. तर आकाशात दूरवर धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
(हेही वाचा –दिल्लीतील जेएनयूमध्ये मराठी अध्यासन सुरु होणार ?; मंत्री Uday Samant यांचे संकेत)
अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल, १५० हून अधिक दुकानांमध्ये आग पसरल्याची माहिती
जवळपास १२ अग्निशमन दलाच्या गाड्या, सहा जंबो टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग १५० हून अधिक लाकडी फर्निचरच्या दुकानांमध्ये पसरली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग फर्निचर मार्केटमध्येच लागली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
Fire at furniture market, Oshiwara, Andheri west#fire #Mumbai #andheri pic.twitter.com/CGcmTnreWH
— Kautilya (@e_sayz) February 11, 2025
सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. लाकडी गोडाऊन आणि फर्निचर मार्केट असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे आणि ती वाढत चालली असल्याची माहिती आहे. दुकानं जळून खाक होत आहे. आतापर्यंत सात ते आठ सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community