AI मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान

40
AI मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान
AI मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या (France) दौऱ्यावर आहेत. दि. १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी फ्रान्सची राजधानी पॅरीसला पोहचले. तिथे पंतप्रधानांचे जोरदार स्वागत झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एआय समिटमध्ये (AI Summit) भाषण केलं. तसेच द्वीपथीय चर्चाही त्यांनी केली. त्यातच पंतप्रधान मार्सिलो या ऐतिहासिक शहराचाही दौरा करणार आहेत. (AI)

( हेही वाचा : राहुल गांधींनी केला Zero चा विक्रम; अनुराग ठाकूर यांचा टोला

या एआय समिटला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, आज एआय काळाची गरज आहे. आमच्याकडे जगातलं सर्वात मोठं टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. आमचं सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करत आहे. ‘एआय’चं (AI) भविष्य खूपच चांगलं आहे आणि एआयमुळे सगळ्याचं हित होणार आहे, असे ही मोदी म्हणाले.

तसेच एआय (AI) कोड फॉर ह्युमॅनिटी (Code for Humanity) लिहतो आहे. एआयमुळे (AI) आयुष्य बदणार आहे. काळ बदलतो असून रोजगाराचं (Employment) स्वरुपही बदलंत आहे. एआयमुळे (AI) रोजगाराचं संकट निर्माण होऊ शकतं. पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की कुठलंही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही. एआयमुळे (AI) नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. एआय आपल्या समाज, अर्थव्यस्था आणि सुरक्षा या आघाड्यांना सकारात्मक पद्धतीने बदलतो आहे. एआय बाबत काही जोखमीचे मुद्दे आहेत. त्यावर विचारमंथन झालं पाहिजे आणि चर्चा केला पाहिजे असंही मोदींनी सुचवले आहे. (AI)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.