Crime : वांद्रे येथे वृद्ध महिलेची हत्या, २ तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

71
Crime : वांद्रे येथे वृद्ध महिलेची हत्या, २ तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Crime : वांद्रे येथे वृद्ध महिलेची हत्या, २ तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

वांद्रे पश्चिम रिक्लेमेशन येथील एका सोसायटीत राहणाऱ्या ६७ वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्या करून लूट करणाऱ्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी २ तासांत अटक केली आहे. सोमवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आलेल्या या हत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्या आणि लूटीचा गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार आरोपी हा मृत महिलेच्या ओळखीचा असून त्यांच्यात आर्थिक वाद देखील सुरू होता अशी माहिती समोर येत आहे. (Crime)

(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्रा मे महिन्यात डायमंड्स लीगने करणार हंगामाची सुरुवात)

रेखा खोंडे (Rekha Khonde) (६७) असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचे नाव असून त्या वांद्रे पश्चिम रिक्लेमेशन आगार, येथील कांचन सोसायटीत मागील काही आठवड्यापासून एकट्याच राहण्यास होत्या, त्यांची मुलगी काही आठवड्यापासून मालाड येथे राहत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून आईचा फोन लागत नसल्यामुळे मुलगी सोमवारी रात्री आईला भेटण्यासाठी आली होती, घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे तीला संशय आला व तीने वांद्रे पोलिसांना कळवले, पोलिसांनी घटनास्थळी येऊन दार उघडून आत प्रवेश केला असता रेखा खोंडे (Rekha Khonde) या वयोवृद्धेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आणि रस्सीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला, मृत महिलेच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा पोलिसांना आढळून आल्या, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालय (Cooper Hospital) येथे पाठवून दिला. (Crime)

(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd ODI : ‘रणजी सामन्याचा फायदा झाला असं रवींद्र जडेजा का म्हणतो?)

मृत महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता मृत महिलेच्या मुलीने त्याच परिसरात राहणारा शरीफ अली समशेर अली शेख (२७) याच्यावर संशय व्यक्त केला, पोलिसांनी शरीफचा शोध घेऊन दोन तासांत त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत महिला ही शरीफला ओळखत होती, शरीफचे तिच्या घरी जाणे येणे होते, तसेच शरीफ याला मृत महिलेने काही रक्कम दिली होती, ती परत करण्यावरून त्यांच्यात वाद होता, त्यातून शरीफने हे हत्याकांड घडवून आणले तसेच कपाटातील सोनं आणि रोख रक्कम चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी शरीफला अटक केली आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.