राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे पद मिळवुन देण्याच्या नावाखाली माहीम येथील एका राजकिय पक्षाच्या पदाधिकारी याला २५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन जणांना मुंबई गुन्हे (Crime) शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अर्पिता अरविंद सावंत (Arpita Arvind Sawant) (३०) आणि गौरव विक्रम नंदा (Gaurav Vikram Nanda) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून गौरव नंदा याला नोएडा येथून अटक केली आहे. या दोघांवर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगात प्रतिष्ठित पदाचे आश्वासन देऊन राजकीय पक्षाचे पदाधिकारी अँजेलो फर्नांडिस (४५) यांना फसवल्याचा आरोप आहे. माहीम (Mahim) येथील भाजपा कार्यकर्ते फर्नांडिस यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगात पदासाठी अर्ज केला होता. (Crime)
(हेही वाचा – MahaKumbh 2025 : अमृतस्नानासाठी १५ फेब्रुवारीनंतर या; प्रचंड गर्दीमुळे प्रयागराज प्रशासनाचे भाविकांना आवाहन)
अँजेलो फर्नांडिस यांनी जून २०२४ मध्ये दिल्लीतील मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिफारस पत्रे सादर केली. ऑगस्ट २०२४ मध्ये, फर्नांडिस यांना अर्पिता यांचा फोन आला, तीने स्वतःला त्यांच्या पक्ष कार्यालयातून असल्याचा दावा केला. तीने त्यांना सांगितले की त्यांचा अर्ज अमित शर्मा नावाच्या व्यक्तीला देण्यात आला आहे. त्यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली – पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीसाठी २५ लाख रुपये आणि शिफारस पत्रासाठी २५ लाख रुपये, याप्रकरणी फर्नांडिस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर रविवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अर्पिताला तिच्या मालाड पूर्व येथील अपार्टमेंट मधून अटक केली. तिला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नंदाला सोमवारी नोएडा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, अमित शर्मा आणि हिमांशू असे आणखी दोन जणांचा शोध घेण्यात येत आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community