Bangladeshi infiltrators: इराकला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक

45

भारतीय पासपोर्टचा (Indian Passport) वापर करत इराक येथे निघालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना (Bangladesh citizens) मुंबईतील पायधुनी येथून अटक करण्यात आले आहे. हे तिघे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून इराक देशात पळून जाणार होते. सदर कारवाई छत्तीसगड एटीएसच्या पथकाने मुंबई एटीएसच्या (Mumbai ATS) मदतीने केली आहे. या तिघांपैकी दोघेजण सख्ये भाऊ असून या तिघांनी बनावट मार्कशीटच्या आधारे रायपूर पत्त्यावरून भारतीय पासपोर्ट मिळवून इराकला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. छत्तीसगड एटीएस (Chhattisgarh ATS) पथकाने या तिघांचा ट्रान्झिट रिमांड घेऊन रायपूरला रवाना झाले आहे. (Bangladeshi infiltrators)

(हेही वाचा – राज्यात ‘उमेद मॉल’ उभारून २५ लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट; CM Devendra Fadnavis यांचे विधान)

मिळलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्माईल (२७), शेख अकबर (२३) आणि शेख साजन (२२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मूळचे बांगलादेशातील खुलना प्रांतातील जेसोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि ते रायपूरमधील टिकरापारा येथील मिश्रा बडा येथे राहत होते. हे तिघे हावडा-मुंबई एक्सप्रेसने मुंबईला निघाले असून तेथून ते तिघे मुंबई येथून इराकला जाणार असल्याची माहिती छत्तीसगड एटीएस मिळाली होती. छत्तीसगड एटीएसने  मुंबईच्या नागपाडा युनिटच्या मदतीने पायधुनी परिसरात छापा टाकण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.  त्यांच्याकडून भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि बगदाद व्हिसा (Baghdad Visa) जप्त करण्यात आला. हे तिघे धार्मिक यात्रेच्या निमित्ताने इराकला जाणार होते अशी माहिती चौकशीदरम्यान समोर आली.

आरोपींनी सांगितले की ते झियारत (धार्मिक यात्रा) च्या बहाण्याने इराकला (Iraq) जात होते, परंतु प्रत्यक्षात त्यांनी तेथे गुप्तपणे स्थायिक होण्याची योजना आखली होती आणि भारतात परतण्याचा त्यांचा हेतू नव्हता.  तपासात असेही समोर आले आहे की रायपूरमध्ये राहत असताना, तिघांनी सत्कार संगणकाचे ऑपरेटर मोहम्मद आरिफ यांच्या मदतीने बनावट गुणपत्रकांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे बनवून भारतीय पासपोर्ट मिळवले होते. पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की, मोहम्मद आरिफ आणि शेख अली यांच्या मदतीने इतर अनेक लोकही अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे बनवून इराकला गेले आहेत आणि परत आले नाहीत. या टोळीतील इतर सदस्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

(हेही वाचा – Maghi Ganeshotsav 2025 : कृत्रिम तलावातच गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे महापालिकेचे आवाहन)

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध रायपूरच्या टिकरापारा पोलिस ठाण्यात (Tikrapara Police Station of Raipur) भारतीय पासपोर्ट कायद्याच्या कलम १२(ई) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत आणि या संशयितांचा कोणत्याही मोठ्या नेटवर्कशी संबंध आहे का याचा तपास करत आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.