![Municipal schools : महापालिका शाळांमधील मुलांची सहल किडझेनिया पार्क आणि राणीबागेत, प्रत्येक विद्यार्थ्यामागे येणाऱ्या खर्चावर शंका Municipal schools : महापालिका शाळांमधील मुलांची सहल किडझेनिया पार्क आणि राणीबागेत, प्रत्येक विद्यार्थ्यामागे येणाऱ्या खर्चावर शंका](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-12T075709.359-696x377.webp)
मुंबई महापलिका शाळांमधील मुलांची यंदाही भायखळा राणीबाग आणि घाटकोपर येथील किडझेनिया पार्कमध्ये नियोजित असून या किडझेनिया पार्कसाठी विद्यार्थ्यामागे प्रत्येकी ७०० रुपये तर राणीबागेतील सहलीसाठी प्रत्येकी ६३० रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे राणीबागेचीजागा महापालिकेची असूनही त्याठिकाणी महापालिका प्रत्येकी ६३० रुपये मोजणार आहे, तर घाटकोपरमधील किडझानिया पार्क मध्ये विविध प्रकारचे खेळ आणि उपक्रम असताना तिथे जर ७०० रुपये खर्च येणार असेल राणीबागेत ६३० रुपये का असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. (Municipal schools)
(हेही वाचा- धामणी मध्यम प्रकल्पग्रस्तांसाठी पर्यायी जमिनीसाठीचा निर्णय घेण्याचे मंत्री Makarand Jadhav Patil यांचे आदेश)
मुंबई महापालिका शाळांमधील इयत्ता ४थी विद्यार्थ्यांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय आणि इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घाटकोपर ‘किड्झानिया थीम पार्क, येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात. महापालिकेतील शालेय मुलांची सहल राणीबागेत आयोजित करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असून त्यानुसार मागील काही वर्षांपासून इयत्ता चौथीच्या मुलांना राणीबागेत सहलीसाठी नेले जाते. राणीबागेत कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत, जी मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. तसेच राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच असल्याने या प्राणी संग्रहालयात विविध प्राण्यांचा वावर मुलांना पाहण्यास मिळतात, म्हणून सहलीसाठी हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. (Municipal schools)
तर वास्तविक जीवनातील भूमिका खेळता खेळता मुलांना शिकविणारे असे हे ठिकाण असून प्रत्येक कार्यकृती मुलांना आर्थिक साक्षरता, स्वातंत्र्य आणि वास्तविक जीवन शिकविण्यासाठी एक अद्वितीय भुमिका साकारण्याचा अनुभव देते. या थीम पार्कमध्ये, जसे रेडीओ जॉकी बनण्यासाठी कोणते गुण असावे, विमानात प्रवास करताना कशा प्रकारे वागले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची पूर्तता व आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार कसे करायचे, बिस्कीटे अथवा आईस्क्रीम कसे करावयाचे. आग लागल्यास फायर ब्रिग्रेड कार्य कसे करते अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळतात. या मिळालेल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना स्थांच्या जीवनात होतो. त्यामुळे इयत्ता सातवीतील शालेय मुलांची सहल किझझानिया येथ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, (Municipal schools)
(हेही वाचा- BMC : पायाभूत प्रकल्पांसाठी थेट १३ हजार कोटींची रक्कम केली जाणार खर्च)
१५ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून) एक दिवसीय सहलींचे आयोजन करण्याया दृष्टीकोनातून शाळांकडून वेळापत्रक बनवण्यात आले आहे. यासाठी राणीबागेतील सहलीची जबाबदारी श्रीयांश एंटरप्रायझेस या कंपनीवर सोपवण्यात आली आहे. या सहलीसाठी इयत्ता चौथीचे सुमारे ३६ हजार विद्यार्थी गृहीत धरले आहेत. यासाठी प्रत्येकी ६३० रुपये सहलीसाठी मोजले जाणार आहेत, तर घाटकोपर किडझानिया थिम पार्क येथील सहलीसाठी इयत्ता सातवीचे २८,४१३ विद्यार्थी गृहीत धरले आहे. यासाठी प्रत्येकी ७०० रुपये खर्च होणार आहे. यासाठी इमॅजिनेशन एज्युटेनमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे राणीबागेतील सहलीसाठी २ कोटी २६ लाख ८१ हजार रुपये आणि घाटकोपर किडझानिया येथील सहलीसाठी २ कोटी ० ६ लाख रुपये अशाप्रकारे एकूण सुमारे ५ कोटी रुपये सहलीकरता खर्च केले जाणार आहे. (Municipal schools)
विशेष म्हणजे राणीबाग महापालिकेची असतानाही तसेच सर्वच निशुल्क असताना प्रवास भाडे, नाश्ता, जेवण आदीकरता प्रत्येकी ६३० रुपये खर्च दर्शवला आहे, तर दुसरीकडे जिथे प्रवेश शुल्कच अधिक मोजला जातो तिथे घाटकोपर किडझानिया थिम पार्कमध्ये प्रत्येकी ७०० रुपये खर्च येत असल्याने राणीबागेतील पैसे अधिक का असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Municipal schools)
(हेही वाचा- BMC: मुंबईत मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमाची प्रगती धिम्यागतीने )
याबाबत शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवास भाडे, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण तसेच प्रवेश शुल्क आदींचा समावेश आहे. राणीबागेत प्रवेश शुल्क आकारले जात नसले तरी किडझानिया थिमपार्कमध्ये प्रवेश शुल्क भरले जाणार आहे, परंतु त्यांनी महापालिकेच्या मुलांना सवलत दिलेली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हे दर मागील वर्षांप्रमाणेच असल्याचे त्यांनी नमुद केले. (Municipal schools)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community