पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवार, १२ फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या ऐतिहासिक अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald TrumpDonald Trump) यांच्यासोबतच्या या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. (Modi-Trump Meet) यामध्ये व्यवसायाचा मुद्दा वरच्या क्रमांकावर असणार आहे. टॅरिफमध्ये पुढाकार घेत, भारताने सर्वसाधारण अर्थसंकल्पातच अमेरिकन बाइक्स आणि इतर लक्झरी वस्तूंवर ७० टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली होती. पण अमेरिका भारतासोबत व्यापार संतुलनावर भर देत आहे.
(हेही वाचा – तुम्ही नगरसेवक असताना किती बेकायदा बांधकामांवर कारवाई केली ? ठाकरे गटाच्या नगरसेवकाला High Court ने सुनावले)
भारताचा अमेरिकेसोबत सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा व्यापार अधिशेष आहे. आर्थिक एजन्सी नोमुराच्या मते, ट्रम्प अमेरिकन हितासाठी भारतावर शुल्क लादू शकतात. भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा होऊ शकते. संरक्षण करारामध्ये तेजस मार्क-२ लढाऊ विमान आणि एमक्यू-९बी ड्रोनसाठी इंजिन खरेदी करण्याबाबत चर्चादेखील समाविष्ट असेल. तेजस इंजिन खरेदीमध्ये भारताला ८० टक्के तंत्रज्ञान हस्तांतरण हवे आहे.
हेही विषय चर्चेत येऊ शकतात
बांग्लादेश हिंदू अल्पसंख्याकांना (hindus in bangladesh) सुरक्षा देण्यात युनूस सरकारच्या अपयशाबद्दल मोदी-ट्रम्प यांनी आधीच विधाने केली आहेत. त्याविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवाद मुद्दाही भारत उपस्थित करेल. खलिस्तानी दहशतवादी पन्नूला हद्दपार करण्याबाबत चर्चा होऊ शकते. तसेच अमेरिकेत लपलेल्या गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोईसारख्या १२ गुंडांची यादी दिली जाऊ शकते. (Modi-Trump Meet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community