Virat Kohli : ‘फॉर्ममध्ये नसतानाही कोहलीच सर्वोत्तम’ – ख्रिस गेलकडून विराटचं समर्थन

Virat Kohli : ख्रिस गेलने विराट कोहलीला पाठिंबा देऊ केला आहे

32
Virat Kohli : ‘फॉर्ममध्ये नसतानाही कोहलीच सर्वोत्तम’ - ख्रिस गेलकडून विराटचं समर्थन
Virat Kohli : ‘फॉर्ममध्ये नसतानाही कोहलीच सर्वोत्तम’ - ख्रिस गेलकडून विराटचं समर्थन
  • ऋजुता लुकतुके 

वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा साथीदार ख्रिस गेलच्या मते सध्या फॉर्ममध्ये नसला तरी विराट कोहलीच जगात सर्वोत्तम आहे. विराट कोहली अलीकडे चुकीचे फटके खेळून झटपट बाद होत आहे. कटकमध्येही एक चौकार मारून त्याने सुरुवात चांगली केली. पण, लगेचच तो बादही झाला. त्याच्या बॅटमधून फक्त ५ धावा निधाल्या. पण, अशावेळी बंगळुरू संघातील त्याचा जुना साथीदार ख्रिस गेल कोहलीच्या पाठीमागे उभा राहिला आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा- भारत आणि इस्रायल दहशतवादाविरुद्ध कटिबद्ध; मंत्री Piyush Goyal यांचे विधान)

‘फॉर्म कसाही असला तरी विराट कोहलीच जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. त्याचे आकडे ही गोष्ट स्पष्ट करतात. जगात आणखी कुणाच्या नावावर इतकी शतकं आहेत? क्रिकेटपटूंना खराब फॉर्मचा सामना कधी ना कधी करावाच लागतो. नेमका कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असताना विराट फॉर्मशी झगडतोय. त्यामुळे लढाई थोडी कठीण जाते. पण, त्याला फक्त स्वत:वर विश्वास दाखवायचा आहे. तो पुनरागमन करेलच,’ असं गेलने नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलून दाखवलं. (Virat Kohli)

कोहलीचा कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय प्रकारातील फॉर्मही सध्या खराब आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात विराट स्पर्धेत सर्वोत्तम ठरला होता. पण, त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. पर्थ कसोटीतील शतकाचा अपवाद वगळता इतर सामन्यात फलंदाजीतील तांत्रिक चुकांमुळे विराट बाद झाला आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. पण, दुसऱ्या सामन्यात आदिल रशीदने त्याला ५ धावांवर बाद केलं. (Virat Kohli)

(हेही वाचा- Modi-Trump Meet : पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर; नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेणार)

‘तो आणखी किती सामने भारतासाठी खेळू शकेल ते मला माहीत नाही. पण, तो धावा नक्की करेल. माझा चॅम्पियन्स करंडकातील विक्रम मोडणंही त्याला सहज शक्य आहे. आणि ते तो करेलच,’ असंही गेल यांनी म्हटलं. ख्रिस गेलने एका चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. आणि या विक्रमाविषयी ते बोलत होते. इंग्लंडविरुद्घच्या टी-२० सामन्यांत शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माचंही गेलने विशेष कौतुक केलं. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.