PM Modi In France : पंतप्रधान मोदींची मार्सेलिस भेट; स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण, मार्सेलिसच्या जनतेचे आभार

PM Modi In France : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री फ्रान्सच्या मार्सेलिस शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली

102
PM Modi In France : पंतप्रधान मोदींची मार्सेलिस भेट; स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण, मार्सेलिसच्या जनतेचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवार, ११ फेब्रुवारीच्या रात्री फ्रान्सच्या मार्सेलिस शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांना श्रद्धांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या शहराचे विशेष महत्त्व आहे. त्याचे स्मरण पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले. संबंधित शहराच्या महत्त्वपूर्ण इतिहासाचे स्मरण केले. मार्सेलिस येथे भारतीय वाणिज्य दूतावास उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मार्सेलिसला (Marseille) भेट दिली. (PM Modi In France)

(हेही वाचा – POP Ganesha idols : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार)

“भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रवासात मार्सेलिसचे विशेष महत्त्व आहे. येथेच महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांनी जहाजातून उडी मारून पोहत समुद्रकिनारा गाठला होता. त्या वेळी वीर सावरकरांना ब्रिटीश अधिकाऱ्यांकडे सोपवू नये, अशी मागणी करणाऱ्या मार्सेलिसच्या लोकांचे आणि त्या काळातील फ्रेंच आंदोलकांचेही मला आभार मानायचे आहेत. वीर सावरकर आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देतात”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

वीर सावरकर यांची जगप्रसिद्ध मार्सेलिसची उडी

८ जुलै १९१० साली इंग्रज वीर सावरकरांना राजकीय कैदी म्हणून भारतात घेऊन जात होते. या काळात सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी एस एस मोरिया या जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून समुद्रात उडी मारून पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला होता. त्या वेळी फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी सावरकरांना पकडून पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात दिले.

ब्रिटिशांनी फ्रान्सच्या भूमीवर येऊन केलेल्या या कारवाईचा अनेक फ्रेंच क्रांतीकारक आणि नेते यांनी निषेध केला. तसेच सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात देणे योग्य नव्हते, यासाठी न्यायालयीन लढाही दिला. (PM Modi In France)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.