-
ऋजुता लुकतुके
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने चॅम्पियन्स करंडकापूर्वी कराचीतील नॅशनल स्टेडिअमचं नुतनीकरण पूर्ण केलं असून या मैदानाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. या मैदानावर आता पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील दोन सामने आधी पार पडलीत. आणि १४ फेब्रुवारीच्या अंतिम सामन्यानंतर हे स्टेडिअम चॅम्पियन्स करंडकासाठी आयसीसीला सुपूर्द करण्यात येईल. चॅम्पियन्स करंडकाचा उद्धाटनाचा सामनाही इथंच होणार आहे. १९ फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अशी ही लढत खेळवण्यात येईल. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- आता सर्व शाळांना मिळतील नियमित शिक्षक; Contract Teachers भरतीचे शासनाचे धोरण अखेर रद्द)
स्टेडिअमच्या नुतनीकरणात ७०० कामगारांनी हातभार लावला. उद्गाटनाच्या निमित्ताने पाक क्रिकेट मंडळाने या सर्व कामगार आणि अधिकारी वर्गाचा सत्कार केला. ४ महिने या स्टेडिअमचं नुतनीकरण सुरू होतं. आता इथले फ्लडलाईट्स बदलण्यात आले आहेत. पॅव्हेलिअनच्या बरोबर समोर नवीन प्रेक्षक गॅलरी असलेली इमारत उभी राहिली आहे. आणि मैदानावर दोन मोठे गुणफलक तसंच मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. (Champions Trophy 2025)
A festive atmosphere at the new-look National Bank Stadium, Karachi 🙌✨
📺 Watch the inauguration ceremony ➡️ https://t.co/szo7tjSOAC pic.twitter.com/oYOrrkUBeo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 11, 2025
दोन्ही संघांसाठीच्या ड्रेसिंग रुम आता नव्याने बांधण्यात आल्या आहेत. तर समालोचन कक्ष तसंच काही कॉर्पोरेट बॉक्सही नवीन बांधण्यात आले आहेत. तसंच प्रेक्षकांची गॅलरीही नव्याने बांधण्यात आली आहे. हे स्टेडिअम पाकिस्तानमधील सगळ्यात जुनं आणि ऐतिहासिक आहे. त्यामुळे मैदानाचा जुना चेहरा मोहरा तसाच राहील याची काळजी नुतनीकरणाच्या वेळी घेण्यात आली आहे. पण, त्याचवेळी स्टेडिअममध्ये सुखसोयींच्या बाबतीत आधुनिकता आणण्यात आली आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Ranji Trophy 2025 : मुंबईचा रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश, हरयाणाचा केला १५२ धावांनी पराभव)
सुरुवातीला पाक मंडळाने या कामासाठी ४ अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद केली होती. पण, बांधकाम लांबल्यामुळे खर्च काही पटींनी वाढला आहे. वेळेत स्टेडिअम उभारून न झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ टीकेचं धनी झालं आहे. पण, आता स्पर्धेपूर्वी तीनही स्टेडिअम तयार असल्याचा त्यांचा दावा आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community