sandhan valley ला जायचं असेल तर कसे पोहोचाल? आणि काय आहेत वैशिष्ट्ये?

29
sandhan valley ला जायचं असेल तर कसे पोहोचाल? आणि काय आहेत वैशिष्ट्ये?

सांदण व्हॅलीला (sandhan valley) सावलीची दरी म्हणूनही ओळखलं जातं. सांदण व्हॅली ही २०० फूट खोल आणि २ किलोमीटर लांबी असलेली दरी आहे. ही दरी महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटात स्थित आहे.

सांदण व्हॅली (sandhan valley) येथे ट्रेक करताना तुम्हाला खडकाळ भूप्रदेशातून जावं लागतं. हा ट्रेकर्ससाठी एक वेगळाच अनुभव असतो.

सांदण दरी ही तिच्या उंच दगडी भिंती, नैसर्गिक गुहा आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकर्ससाठी इथे ट्रेकिंग करणं म्हणजे एक रोमांचक अनुभव असतो.

(हेही वाचा – government medical colleges in mumbai : मुंबईतील सर्वोत्तम सरकारी महाविद्यालये कोणकोणती आहे?)

सांदण व्हॅलीला (sandhan valley) भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांदरम्यान असतो. या काळात इथलं हवामान आल्हाददायक असतं. तसंच ही दरी हिरवीगार असते. या काळामध्ये तापमान १५-२५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं.

पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान या ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या दरीजवळ कोणालाही येऊ दिलं जात नाही.

मे महिना आणि जून महिन्याच्या पहिल्या २ आठवड्यात इथे भरपूर काजवे पाहायला मिळतात. काजवे पाहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इथे ट्रेक करू शकतात.

(हेही वाचा – भारताचे जबरदस्त फलंदाज Gundappa Viswanath यांचा जन्मदिन; जाणून घ्या त्यांच्याबद्दलची खास वैशिष्ट्ये)

  • ट्रेकिंगची डिफिकल्टी : मध्यम
  • सर्वोत्तम ऋतू : हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)
  • सर्व वयोगटासाठी : योग्य आहे
  • पायथ्याचं गाव : समरड

सांदण व्हॅली (sandhan valley) ही महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. इथे ट्रेक करण्यासाठी पायथ्याचं मूळ गाव समरड हे आहे. हे गाव रस्त्याने आणि रेल्वे मार्गाने चांगलं जोडलेलं आहे.

(हेही वाचा – Maghi Ganeshotsav 2025 : माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल)

सार्वजनिक वाहतुकीद्वारे या ठिकाणी यायचं असेल तर :

  • तुम्ही सीएसटी/दादरहून कसारा येथे लोकल ट्रेनने जाऊ शकता. कसारा येथे ट्रेनने पोहोचण्यासाठी ३ तास एवढा वेळ लागेल.
  • पुढे कसारा येथून शेअर्ड जीप किंवा खाजगी जीपनेही तुम्ही जाऊ शकता. समरड येथे पोहोचण्यासाठी अडीच तास लागतात.
  • समरड गावात जाण्यासाठी जीपच्या प्रवासाची किंमत सुमारे २५०० ते ३००० रुपये असू शकते. जर तुम्ही वाटाघाटी करून सव्वाशे ते पंधराशे रुपयांत जाऊ शकलात, तर तुम्ही त्याच व्यक्तीकडून परतीचा प्रवास बुक करू शकता.

खाजगी वाहनाने जायचं असेल तर :

मुंबईपासून समरड गावचं अंतर सुमारे १९० किलोमीटर एवढं आहे. आणि पोहोचण्यासाठी ५ तास लागतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.