![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-12T143406.499-696x377.webp)
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला होता. यामुळे सबंध भारत हादरला होता. पाकिस्तानचा नीच आणि जिहादी विकृत चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. त्यांचे जिहादी मनसुबे पुन्हा एकदा निर्वस्त्र झाले. या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले.
पण हा बदललेला भारत आहे. आधी प्रमाणे भारत सरकार पाकिस्तानला पुरावे सादर करत बसले नाही. तर भारताने या हल्ल्याचा प्रतिशोध घेतला. २६ फेब्रुवारीला सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आणि त्यांना दाखवून दिलं की तुम्ही एका गालावर थप्पड मारलीत तर आम्ही दोन्ही गाल उपटून टाकू.
पुलवामा हल्ल्यानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलं. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. चला तर पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहूया. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी विशेष संदेश घेऊन आलो आहोत :- (pulwama attack quotes)
(हेही वाचा – sandhan valley ला जायचं असेल तर कसे पोहोचाल? आणि काय आहेत वैशिष्ट्ये?)
१.
आमचे रक्षण करताना
हुत्मात्मा झालेल्या
वीर जवानांना माझा मानाचा मुजरा…
२.
तुमच्या शौर्याचे अमर गीत
या गोंगाटात हरवले नाही
तुमच्या आठवणीत आम्ही
अश्रू ढाळत निजलो नाही
३.
त्या वीर हुतात्म्यांना कोटी कोटी नमन
ज्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी दिली प्राणाची आहुती
४.
भारतमाता तुझे वैभव सदा चिरंजीव राहो
आम्हा हौतात्म्यांचे प्राण राहो न राहो
५.
रक्तात भिजला गणवेश
पण सुरक्षित राहिला देश
भारताच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली (pulwama attack quotes)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकापूर्वी कराचीतील नॅशनल स्टेडिअमचं दिमाखात उद्घाटन)
६.
आम्ही इथे साजरा करत होतो व्हॅलेंटाईन डे
बलिदान देऊन त्यांनी देशभक्तीचे धडे
७.
आज आकाशात शेकडो पक्षी दिसले उडताना
वीर हुतात्म्यांना मूक श्रद्धांजली वाहताना…
८.
आज व्हॅलेन्टाईन्स डे असला तरी प्रेमीयुगुलांनो,
नका विसरु भारतमातेवर प्रेम करणार्या जवानांना
भारताच्या शूर वीरांना श्रद्धांजली
९.
मित्रहो, खरे व्हॅलेंटाईन तर ते शूर वीर जवान आहेत
जे मातृभूमीच्या रक्षणासाठी आहुती देण्यास तत्पर आहेत
१०.
हौतात्म्याचे किस्से
क्रांतीची कहाणी
नेहमीच लक्षात राहील
पुलवामाची कुर्बानी (pulwama attack quotes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community