Pulwama attack : १४ फेब्रुवारीला झाला होता पुलवामा हल्ला; किती जवान झाले हुतात्मा? वाचा चित्तथरारक कथा!

32
Pulwama attack : १४ फेब्रुवारीला झाला होता पुलवामा हल्ला; किती जवान झाले हुतात्मा? वाचा चित्तथरारक कथा!
पुलवामा हल्ला

१४ फेब्रुवारी २०१९ साली केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या म्हणजेच CRPF च्या २,५०० पेक्षा जास्त जवानांना घेऊन जाणारा ७८ वाहनांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून जम्मूहून श्रीनगरला जात होता. हा वाहनांचा ताफा पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून निघाला होता. दोन दिवसांपासून महामार्ग बंद असल्यामुळे मोठ्या संख्येने जवानांना घेऊन जात होते. सूर्यास्तापूर्वी हा ताफा त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचणार होता.

अवंतीपोरा जवळच्या लेथपोरा इथे दुपारी सव्वातीनच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला, स्फोटकांनी भरलेल्या एका कारने धडक दिली. या या धडकेमुळे झालेल्या स्फोटात ७६ व्या बटालियनचे ४० सीआरपीएफचे जवान हुतात्मा झाले आणि अनेक जण जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना श्रीनगरमधल्या लष्करी तळाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Pulwama attack)

(हेही वाचा – top 10 instagram followers : हे आहेत टॉप १० instagram followers असलेले अकाउंट्स)

पुलवामा हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या वेगवेगळ्या राज्यातल्या जवानांची संख्या

राज्य – संख्या
उत्तर प्रदेश – १२
राजस्थान – ५
पंजाब – ४
बंगाल – २
ओडिसा – २
उत्तराखंड – २
बिहार – २
महाराष्ट्र – २
तामिळनाडू – २
आसाम – १
कर्नाटक – १
जम्मू आणि काश्मीर – १
हिमाचल प्रदेश – १
केरळ – १
झारखंड – १
मध्य प्रदेश – १
एकूण – ४०

पाकिस्तानमध्ये असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी काकापोरा इथल्या २२ वर्षीय हल्लेखोर आदिल अहमद दारचा व्हिडिओही जारी केला होता. तो आदिल अहमद दार एका वर्षापूर्वी या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

पाकिस्तानने या पुलवामा हल्ल्यातला कोणताही सहभाग नाकारला, तरी जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर देशात कार्यरत असल्याचं सर्वज्ञात आहे. १९८९ सालानंतर काश्मीरमध्ये भारताच्या राज्य सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेला हा सर्वात घातक दहशतवादी हल्ला होता. (Pulwama attack)

(हेही वाचा – Rock Climbing : ‘सॅक’ ची पंचविशी आणि २५ सुळक्यांची चढाई)

पुलवामा हल्ल्यानंतरच्या भारत आणि पाकिस्तान यांच्या प्रतिक्रिया

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सहानुभूतीही दर्शविली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिलं जाईल असं आश्वासन दिलं. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं. बीबीसीआय न्यूजने म्हटले आहे की, बॉम्बस्फोटात जैश-ए-मोहम्मदचा सहभाग हा पाकिस्तानशी “थेट संबंध जोडतो”.

सुरक्षा विश्लेषकांना हे माहिती आहे की, जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसचीच निर्मिती आहे. पाकिस्तानने २००२ मध्ये या संघटनेवर बंदी घातली होती, पण ती वेगवेगळ्या नावांनी पुन्हा उदयास आली आहे आणि तिला आयएसआयचा पाठिंबा कायम आहे. पाकिस्तानने या हल्ल्याशी संबंध असल्याचा आरोप फेटाळला आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या बॉम्बस्फोटाचा निषेध केला. तसंच पाकिस्तानचे केंद्रीय माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, पाकिस्तान जैश-ए-मोहम्मद या संघटनेविरुद्ध कारवाई करत आहे. तसंच दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यात पाकिस्तान भारताला मदत करू शकेल. (Pulwama attack)

(हेही वाचा – pulwama attack quotes : पुलवामा हल्ल्याने हादरला देश; चला पाहूया pulwama attack मराठी quotes)

१९ फेब्रुवारी २०१९ साली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणे पाकिस्तानच्याही हिताचे नाही. त्यांनी पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मागितले आणि भारताला इशारा दिला की, कोणत्याही लष्करी कारवाईला प्रत्युत्तर दिलं जाईल. हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल आणि पीडितांसाठी कोणतीही शोकसंवेदना न दिल्याबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यावर टीका केली आणि ते म्हणाले की, आदिल अहमद दार आणि पाकिस्तान येथे असलेल्या जैश-ए-मोहम्मद यांचे दावे हेच पुरेसे पुरावे आहेत. त्यांनी असंही म्हटलं आहे की, मुंबई आणि पठाणकोट हल्ल्याच्या तपासात प्रगती नसल्याने तपासाचे आश्वासन पटण्यासारखे नाही. पुलवामा येथे झालेल्या या हल्ल्यानंतर, कबीर सिंग आणि सॅटेलाइट शंकर यांच्यासह अनेक भारतीय हिंदी चित्रपटांच्या निर्मात्यांनी पाकिस्तानमध्ये चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला.

माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय ने २०१९ सालच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या विश्वचषक संघ सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास बंदी घालण्याबाबत चिंता व्यक्त केली. तरीही दुबईमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने पाकिस्तानला विश्वचषकातून बंदी घालण्याबाबत BCCI च्या विधानाला नकार दिला. तसंच दोन्ही देशांमधल्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नियोजित सामना नियोजित वेळेनुसारच होईल असं म्हटलं. (Pulwama attack)

८ मार्च २०१९ साली भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने रांची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये, पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या CRPF च्या जवानांना श्रद्धांजली म्हणून लष्करी टोप्या परिधान केल्या होत्या. त्यावेळी खेळाडूंनी त्यांचं सामना शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीला दान केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या कृत्याचा निषेध करण्यासाठी आयसीसीला पत्र लिहिलं होतं. पण आयसीसीने त्यांना उत्तर दिलं की, बीसीसीआयने त्या कॅप्स घालण्याची परवानगी आधीच मागितली होती आणि त्यांना ती परवानगी दिली गेली होती. मात्र पुढे भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकच्या मुसक्या आवळल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.