अखेर Sunita Williams आणि Butch Wilmore यांच्या परतीचा महिना ठरला

84
अखेर Sunita Williams आणि Butch Wilmore यांच्या परतीचा महिना ठरला
अखेर Sunita Williams आणि Butch Wilmore यांच्या परतीचा महिना ठरला

अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) लवकरच अंतराळ स्थानकात परतणार आहेत. मंगळवारी नासाने (NASA) सांगितले की, ते मार्चच्या मध्यात परततील. दोन्ही अंतराळवीर गेल्या 8 महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. यापूर्वी, अंतराळवीरांच्या परतीची अंतिम मुदत मार्च किंवा एप्रिलच्या अखेरीस निश्चित करण्यात आली होती. त्यांना स्पेसएक्स (SpaceX) कॅप्सूलमध्ये परत आणले जाईल. (Sunita Williams)

हेही वाचा-दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढविण्यास बंदी? Supreme Court ने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर   

5 जून रोजी सुनीता विल्यम्स (Sunita Williams) बुच विल्मोरसोबत आयएसएसवर (ISS) पोहोचल्या. ते दोघेही बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलची चाचणी घेण्यासाठी गेले होते परंतु त्यात बिघाड झाल्यानंतर ते पुन्हा आयएसएसमध्येच राहिले. तेव्हापासून ते दोघेही तिथेच अडकले आहेत. (Sunita Williams)

हेही वाचा-राम मंदिराचे मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांचे निधन

नासाने फेब्रुवारी २०२५ मध्ये एलोन मस्कची (Elon Musk) कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे (Dragon spacecraft) सुनीता आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याची माहिती दिली होती. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांच्याकडे अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचे काम सोपवले आहे. (Sunita Williams)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.